शिवाजीनगरच्या धर्तीवर स्वारगेट बस डेपो व मेट्रो स्थानक विकसित करणार

तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश

शिवाजीनगरच्या धर्तीवर स्वारगेट बस डेपो व मेट्रो स्थानक विकसित करणार

मुंबई : प्रतिनिधी 

शिवाजीनगर येथील बसस्थानक विकसित करण्यासाठी  महामेट्रो व राज्य परिवहन महामंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला होता. त्या अनुषंगाने हे बस स्थानक विकसित होत आहे. याच धर्तीवर स्वारगेट येथील बस स्थानक व मेट्रो स्थानक ही विकसित करावे, अशा सूचना  राज्याचे परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केल्या. याबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे अजित पवार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 

बांधा,  वापरा, हस्तांतरण करा या तत्त्वानुसार  शिवाजीनगर (पुणे) बसस्थानक विकसित करण्यात आले आहे याच अनुषंगाने आज मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली  यावेळी हे काम तात्काळ पूर्ण करण्याबाबत सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले . या बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, नवि विभाग अ.मु.स. असिम गुप्ता, पुणे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर तसेच राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक  माधव कुसेकर हे उपस्थित होते.

या बैठकीमध्ये राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी शिवाजीनगर बस स्थानकाच्या धर्तीवर स्वारगेट येथील बस स्थानक व मेट्रो स्थानक विकसित करण्याबाबत सूचना केल्या. त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितद पवार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तत्वतः मान्यता दिली व संबंधितांना आठ दिवसाच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे सांगितले. ज्याप्रमाणे शिवाजीनगर येथील बस स्थानकात दोन  चारचाकी वाहनतळ, बस स्थानकाचा तळमजला व व्यावसायिकांसाठी शॉपिंग मॉल आहेत त्याचप्रमाणे स्वारगेट येथील बस स्थानकात अशा प्रकारच्या सुविधा असाव्यात, अशा सूचना यावेळी राज्याचे परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केल्या. 

पुणे महा मेट्रो व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ दोघांच्या समन्वयातून ही सुंदर व सर्व सोयींनी युक्त  अशी इमारत लवकरच उभी राहील, अशी ग्वाही यावेळी राज्यमंत्री माधुरी  मिसाळ यांनी दिली.

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us