MLA Abhijit Patil | आ.अभिजित पाटलांच्या ३५०० रुपयांच्या धपक्याची चर्चा कायम!
चालू हंगामात गाळपासाठी आलेल्या उसाला ३५०० रूपये कधी देणार यासाठी अभिजित पाटील यांना मोबाईल वर सलग दोन दिवस संपर्क केला असता त्यांचे स्वीय सहायक फोन उचलून आमदार अभिजित पाटील हे मिठींगमध्ये आहेत लवकरच त्यांचे शी बोलणं करून देतो म्हणून फोन ठेवतात व पुन्हा फोन केला असता पुन्हा तेच उत्तर दिले जाते.यातुन आमदार अभिजित पाटील हे उस दर देण्याविषयी चालढकल करीत असल्याची शंका उपस्थित होत आहे.
टेंभुर्णी, प्रतिनिधी
माढा विधानसभा मतदारसंघात मागील सहा महिन्यांपासून उस दराचा "३५०० रुपयांचा धपका " याची चर्चा जोरदार चालू असून विधानसभा निवडणुकीच्या अगोदर उसाला ३५०० चा धपका ( दर ) देणार म्हणून तर आता निवडणुका संपून तीन महिने झाले तरी आणखीन दर दिला नाही आणि आमदार अभिजित पाटील जाहिर केलेला दर देणार कि नाही याविषयी उस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये "धपक्याची"जोरदार चर्चा सुरू आहे.
माढा विधानसभा लढवायची निश्चित नसताना आमदार अभिजित पाटील यांनी १ ऑगस्ट रोजी टेंभुर्णी येथे वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार समारंभाला उत्तर देताना आपण श्री विठ्ठल कारखान्याला २४/२५ च्या गळीत हंगामासाठी आलेल्या उसाला ३५०० चा धपका ( प्रतिटन ३५०० रूपये दर ) देऊ असे जाहीर केला होता
या जाहिर केलेल्या धपक्या वरून जिल्ह्यातील कारखानदारामध्ये खळबळ माजली होती.तर अनेक कारखानदारांनी ३५०० रूपयांचा दर देणे शक्य नाही असे जाहीर भाषणातून स्पष्ट केले होते तर ते काही का असेना आपल्या उसाला ३५०० दर मिळणार म्हणून शेतकरी सुखावला होता. तर याचा परिणाम ही माढा विधानसभा निवडणुकीत पहायला मिळाला कारण या भागामध्ये आमदार बबनदादा शिंदे यांनी आतापर्यंत उसाला सर्वात जास्त दर देऊन नियमित उस बिले दिलेली आहेत.
त्याचा परिणाम प्रत्येक निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे यांना मोठ्या प्रमाणावर मतदान करून शेतकरी पसंती देत होते. तर त्यांचे विरोधात निवडणूक लडलेले प्रा.शिवाजीराव सावंत, कल्याणराव काळे यांचे पेक्षा जास्त उस दर आमदार शिंदे देत असल्याने त्यांना शेतकऱ्यांची पसंती मिळून मोठ्या मताधिक्ययाने विजयी होत होते. परंतु चालू हंगामातील आमदार अभिजित पाटील यांनी ३५०० चा दर जाहीर केल्याने व कारखाना ८ हजार वरून १४ हजार क्रशींग विढवणार असल्याचे सांगून दर जाहीर केला.
अभिजित पाटील हे उमदे, तरूण व धाडसी नेतृत्व असल्याने ते जाहिर केलेला उस दर नक्कीच देतील.व आपल्या उसाचा भाव वाढल्याने उत्पन्नात वाढ होईल व आत्तापर्यंत या कारखानदारांनी उस दर कमी देऊन आपले उस उत्पादक शेतकऱ्यांचे किती पैसे "हाणले" अशी भावना निर्माण होऊन इतर कारखानदारांचे विरोधात शेतकऱ्यांचे मनात रोश निर्माण होऊन नाराजी झाली व याचा फायदा अभिजित पाटील यांना होऊन माढ्यातून तीस हजार मतांनी ते विजयी झाले यात "३५०० चा धपका " या चर्चेचा मोठे महत्त्व होते. तर आमदार किचा निकाल लागून तीन महिने संपले कारखाना बंद झाला तरी ३५०० रूपये दर देण्याची घोषणा करून राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून निवडून आलेले विठ्ठल कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित पाटील यांनी ३५०० दर देण्याबाबत एक वाक्यही न काढल्याने शेतकरी वर्गातून उस दराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ते जाहीर केलेला उस दर ३५०० रूपये देतात की नाही याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे.विधानसभा निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे व अभिजित पाटील यांचे मध्ये झालेल्या लढतीच्या प्रचारामध्ये विठ्ठल कारखान्याचे चेअरमन नुतन आमदार अभिजित पाटील यांनी चालू हंगामात येणा-या उसाला ३५०० रूपये दर देणार असल्याची घोषणा केली होती.
त्या केलेल्या घोषणेनुसार पहिले बिल ३ हजार पाचशे रूपये मिळतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती.परंतु कारखाने चालू होऊन बंद झाला तरी पाटील यांनी उस दराबाबत एक शब्दही काढला नाही.अथवा पहिला हप्ता ३२०० देतील अशी अपेक्षा उस उत्पादक शेतकऱ्यांना होती.परंतु पहिला हप्ता समाधानकारक न काढल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर आहे.तर निवडणुकीच्या अगोदर ३५०० रूपयांचा उसाला भाव देणार म्हणून जोरदार चर्चा होती तर आत्ता कारखाना बंद झाला तरी उसाचा भाव फिक्स न ठरल्याने हाच अभिजित पाटलांचा "धपका" अशी चर्चा शेतकऱ्यांत सुरू आहे.
000
Comment List