'अमेरिकन उत्पादनांवरील कर कमी करण्यास भारताची तयारी'

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

'अमेरिकन उत्पादनांवरील कर कमी करण्यास भारताची तयारी'

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था

अमेरिकन उत्पादनांवर भारतात मोठ्या प्रमाणावर आयात कर लावण्यात येत असल्याच्या आरोपाचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला. भारत आयात करात कपात करण्यास तयार असल्याचा दावा देखील त्यांनी काँग्रेसच्या संयुक्त सभेत बोलताना केला. जे देश अमेरिकन उत्पादनांना अवाजवी आयात कर आकारतात, त्या देशांच्या अमेरिकेतील आयातीवर देखील वाढीव कर लागला जाईल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. 

ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारताच कॅनडा, युरोपियन महासंघ आणि भारतावर देखील अवाजवी आयात कर लादत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. कॅनडा आणि युरोपियन महासंघाने अनेक वर्ष अमेरिकेकडून फायदा करून घेतला आहे. युरोपियन महासंघाची स्थापनाच अमेरिकेकडून फायदे लाटण्यासाठी झालेली आहे, असे ट्रम्प म्हणाले. भारतात देखील अमेरिकन उत्पादनांवर 100% पेक्षा अधिक कर आकारणी केली जाते. ही करआकारणी कायम राहिल्यास अमेरिका देखील या देशांच्या उत्पादनांवर जबर कर आकारणी करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

ट्रम्प यांनी फेब्रुवारीमध्ये कॅनडा आणि मेक्सिको या देशातून होणाऱ्या आयातीवर 25 टक्के तर चीन मधून होणाऱ्या आयातीवर दहा टक्के वाढीव कर लागण्याची घोषणा केली होती. ही करवाढ एप्रिल महिन्यापासून लागू केली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापार करार करण्याविषयी सांगितले होते. या करारात आयात कर आकारणीबद्दल पाऊले उचलली जातील. त्यामुळे अमेरिकेकडून वाढीव आयात कर आकारणीपासून भारताची सुटका होण्याची शक्यता आहे.

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us