'तुकाराम मुंडे यांना द्या मराठवाड्याचे विभागीय आयुक्त पद'
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी
धनंजय मुंडे यांच्यासारख्या मुजोर नेत्यांना पायबंद घालण्यासाठी धडाडीचे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर मराठवाडा विभागीय आयुक्त पदाची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मराठवाड्यात बदलणारी राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेता तुकाराम मुंडे यांच्यासारखा निधडा प्रशासकीय अधिकारी मराठवाड्यात नियुक्त करावा, अशी दमानिया यांची मागणी आहे.
बीडमध्ये बहुतेक राजकीय नेते डोळ्या बाळगून आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून मिळणाऱ्या निधीतून लोकांची कामे करण्यापेक्षा त्यावरील टक्केवारीने या टोळ्या पोचल्या जात आहेत. असा आरोप दमानिया यांनी केला. या प्रकाराला आळा घालण्यासाठी विभागात धडाडीचा प्रशासकीय अधिकारी असणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.
धनंजय मुंडे यांची रोज नवनवीन प्रकरणे आपल्यापर्यंत येत आहेत. लोक लोक मोबाईलवर मेसेजेस पाठवत आहेत. व्हिडिओ पाठवत आहेत. हे सर्व एवढे गंभीर आहे की त्यामुळे आपल्याला रात्र रात्र झोप लागत नाही. धनंजय मुंडे कृषी मंत्री, सामाजिक न्याय मंत्री असताना पुढे येत आहे, असा दावाही दमानिया यांनी केला.
वृत्तवाहिनीऐवजी पोलिसांवर कारवाई करा
मारहाण प्रकरणी फरार असलेला आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या हा माध्यमांना उपलब्ध होतो मात्र, पोलिसांना सापडत नाही. हम नही सुधरेंगे, अशी बीड पोलिसांची स्थिती आहे. पोलीस अधीक्षकांनी खोक्याची मुलाखत घेणाऱ्या वृत्तवाहिनीवर कारवाई करण्याऐवजी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असेही दमानिया म्हणाल्या.
Comment List