बार्टी, पुणे मार्फत अनुसुचित जातीच्या उमेदवारांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण

बार्टी, पुणे मार्फत अनुसुचित जातीच्या उमेदवारांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण

पुणे : औद्योगिकदृष्ट्या संपन्न असलेल्या जर्मनीमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता असल्याने कौशल्य प्राप्त उमेदवारांकरीता रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध आहे. जर्मनी येथे रोजगार प्राप्तीकरीता कुशल मनुष्यबळास जर्मन भाषा अवगत असणे आवश्यक आहे. भारतीय नागरिकांना GOETHE Institute द्वारे आयोजित परीक्षेअंती बहाल केलेली प्रमाणपत्रे ही जर्मन देशात वैध मानली जातात. 

त्यानुषंगाने महाराष्ट्र राज्यातील अनुसुचित जातीच्या 1000 उमेदवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे  मार्फत जर्मन भाषेचे पथदर्शी अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जर्मन भाषेचे प्रशिक्षणाकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्रशिक्षणाचे स्वरूप व प्राप्त लाभांची माहिती करीता इच्छुक उमेदवारांनी बार्टी संस्थेच्या संकेतस्थळावर भेट दयावी. अधिकाधिक पात्र उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन बार्टी संस्थेचे महासंचालक श्री. सुनील वारे व निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार यांनी केले आहे.

 

हे पण वाचा  'कोण कोणाला गिळतोय ते लवकरच कळेल'

000

About The Author

Advertisement

Latest News

Advt