'वाचाळ मंत्र्याला वेळीच आवर घालणे आवश्यक'
नागपूरमधील हिंसेवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
नागपूर: प्रतिनिधी
नागपूरसारख्या शांतताप्रिय आणि सुसंस्कृत भडकलेली हिंसा दुर्दैवी आहे. महायुती सरकारमधील एक वाचाळ मंत्री सातत्याने भडकावणारी व्यक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. या वाचाळवीरांना वेळीच आवर घालण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर येथील हिमसे बाबत बोलताना दिली.
नागपूर हे शांतताप्रिय शहर आहे. नागपूरमधील सर्व समाजाचे नागरिक एकोप्याने राहतात. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ही दीक्षाभूमी आहे. बाबा ताजुद्दीनसारख्या संतांची भक्ती सर्व समाजाच्या भाविकांकडून केली जाते. अशा शहरात असे प्रकार घडणे अयोग्य आहे, असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
हिंसक प्रकार सुरू होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करून त्याची व्याप्ती वाढू दिली नाही याबद्दल वडेट्टीवार यांनी पोलिसांचे कौतुक केले. मात्र, खुद्द मुख्यमंत्र्यांच्या शहरात असे प्रकार का घडतात याच्या मुळाशी जाऊन त्याला जबाबदार असणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.
Comment List