सह्याद्रि कारखान्याच्या बॉयलरचा भीषण स्फोट!

टेस्टींग दरम्यान दुर्घटना; तीन ते चार कर्मचारी गंभीर जखमी, खाजगी रुग्णालय उपचार सुरू 

सह्याद्रि कारखान्याच्या बॉयलरचा भीषण स्फोट!

कराड, प्रतिनिधी

यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यात ईएसपी बॉयलरचा टेस्टींग करताना भीषण स्फोट झाला. गुरुवार (दि. २०) रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये तीन ते चार कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

शैलेश भारती (वय ३२) रा. उत्तर प्रदेश, अमित कुमार (वय १९) रा. बिहार, धर्मपाल (वय १९) रा. उत्तर प्रदेश अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यात ऊसाचे गाळप सुरु आहे. दरम्यान, मागील पंधरा दिवसांपूर्वी ईएसपी बॉयलर कारखान्यात बसविण्यात आला असून त्याचे आठ दिवसांपासून टेस्टींग सुरु आहे. गुरुवार (दि. २०) रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या बॉयलरचे टेस्टींग सुरु होते. यावेळीच बॉयलरचा मोठा स्फोट झाला. त्या दुर्घटनेत टेस्टींगचे काम करणारे तीन ते चार कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे पण वाचा  'कोण कोणाला गिळतोय ते लवकरच कळेल'

000

About The Author

Advertisement

Latest News

Advt