'अजित पवार यांना नाही देणार कार्यक्रमाचे निमंत्रण'

गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

'अजित पवार यांना नाही देणार कार्यक्रमाचे निमंत्रण'

पुणे: प्रतिनिधी

येथे आयोजित करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देणार नसल्याच्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ठाम भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हा कार्यक्रम शासकीय नसून धनगर समाजाचा आहे, असे स्पष्टीकरण देत, राजकीय प्रश्न विचारू नका, असेही पडळकर पत्रकारांना उद्देशून म्हणाले. 

मे महिन्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना तब्बल पन्नास हजार ढोल वाजवून मानवंदना देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची माहिती पडळकर यांनी पत्रकारांना दिली. या कार्यक्रमाला येण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मान्य केले आहे, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेकांना निमंत्रण देणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले. 

पडळकर यांनी सादर केलेल्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव नव्हते. त्याबद्दल विचारणा केली असता पडळकर यांनी, आपण अजित पवार यांना या कार्यक्रमाला बोलावणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. हा शासकीय कार्यक्रम नाही. सरकारची कोणतीही मदत न घेता धनगर समाजाने आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. त्याबद्दल कोणतेही राजकीय प्रश्न विचारू नका, असे पडळकर यांनी सांगितले. 

हे पण वाचा  सुट्टीचा उपयोग नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी करा : प्रा विजय नवले 

एकीकडे महायुती सहभागी असलेल्या घटक पक्षांमध्ये कुरबुरी असल्याचे चर्चा सातत्याने घडत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांच्या खात्यांना निधी मिळत नसल्याची तक्रार खुद्द अमित शहा यांच्याकडे केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पडळकर यांच्या भूमिकेमुळे भाजपलाही अजित दादा नकोसे झाले आहेत काय, अशा चर्चा घडत आहेत. वास्तविक, पडळकर यांनी आपल्या राजकीय आयुष्यात पवार कुटुंबीयांना सातत्याने कडाडून विरोध केल्याचा इतिहास आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला पक्षाची भूमिका मानणे कितपत संयुक्तिक ठरेल, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt