'भारताकडून चोवीस ते छत्तीस तासात होऊ शकतो हल्ला'
पाकिस्तानचे मंत्री अताउल्लाह तरार यांचा गुप्त माहितीच्या आधारे दावा
इस्लामाबाद: वृत्तसंस्था
दहशतवादाला पोचणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतात बैठकांचे सत्र सुरू असताना भारत आणि कोणतीही घोषणा करण्यापूर्वी हल्ल्याचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी पाकिस्तानच्या मंत्र्यांमध्येच जणू चढाओढ लागली आहे. पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या दाव्यानंतर आता सूचना व प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांनी भारताकडून 24 ते 36 तासात पाकिस्तानवर हल्ला होणार असल्याचा दावा गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने केला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा कोणताही सहभाग नसताना भारताकडून तसा अपप्रचार करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने पाकिस्तानवर हल्ला करण्याचा भारताचा डाव असून हा हल्ला एक ते दीड दिवसात होऊ शकतो, असे तरार यांचे म्हणणे आहे. पाकिस्तान स्वतःच दहशतवादाला तोंड देत आहे. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कृत्याची अभिनंदन करतो. तरी देखील भारताकडून पाकिस्तानवर जाणून म्हणून आरोप करण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.
पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी तटस्थ देशांच्या यंत्रणांमार्फत चौकशी करून या हल्ल्यामागील वस्तुस्थिती पुढे आणली गावी असा प्रस्ताव आपण भारताला दिला होता. मात्र, भारत ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. या हल्ल्याबाबत आरोप करणारा भारत, निवाडा करणारा न्यायाधीशही भारत आणि फासावर चढवणारा जल्लाद देखील भारत, अशी भारताची भूमिका असल्याची टीका तरार यांनी केली आहे.
भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास पाकिस्तान त्याला चोख प्रतिउत्तर देईल आणि आपल्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करेल, अशी दर्पोक्ती देखील त्यांनी केली.