बलोच नेत्यांनी केली स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा

बलुचिस्तानसह फडकावले भारताचे झेंडे

बलोच नेत्यांनी केली स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा

इस्लामाबाद: वृत्तसंस्था 

भारतीय सैन्याकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानला दुसरा मोठा धक्का बसला आहे. बलोच नेत्यांनी बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले आहे. आपल्याला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी बलुचिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाकडे केली आहे. त्याचप्रमाणे भारताची राजधानी दिल्ली येथे आपला दूतावास सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती भारताला करण्यात आली आहे. बलोच नेत्यांकडून स्वतंत्र राष्ट्राची घोषणा झाल्यानंतर बलुचिस्तानातील नागरिकांनी बलुचिस्तानच्या झेंड्या बरोबरच भारतीय झेंडेही फडकावत आनंद व्यक्त केला.

भारताची फाळणी झाल्यानंतर आणि पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्यात आले होते. मात्र, अल्पावधीतच पाकिस्तानने आक्रमण करून बलुचिस्तान पाकिस्तानात सामावून घेतले. तेव्हापासूनच बलुचिस्तानात स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरू आहे. मागील काही काळापासून बलोच स्वातंत्र्य सैनिक आक्रमक झाले असून त्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या नाकी नऊ आणले आहेत. आता तर बोलोच स्वातंत्र्यसंग्रामाच्या नेत्यांनी आपण पाकिस्तानातून बाहेर पडून स्वतंत्र राष्ट्र झालो आहोत, अशी घोषणा केली आहे. 

बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्याच्या बलोच नेत्यांच्या कृतीवर अद्याप पाकिस्तानकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय समुदायाचा ठोस पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत बलोच नेत्यांची घोषणा ही केवळ प्रतिकात्मक राहणार आहे. मात्र, त्यामुळे बलुचिस्तान शांत करणे पाकिस्तानला आणखीनच कठीण होणार आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानातील इतर स्वतंत्रतावादी घटक अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

हे पण वाचा  'पाकिस्तान सध्या प्रोबेशनवर, चुकून आगळीक केलीच तर...'

 

About The Author

Advertisement

Latest News

Advt