पाकिस्तानचा जम्मू विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला

भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणेने हवेतच नष्ट केली क्षेपणास्त्र

पाकिस्तानचा जम्मू विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला

नवी दिल्ली: प्रतिनिधी 

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष अधिक व्यापक होत असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानने जम्मूच्या विमानतळावर क्षेपणास्त्र डागून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने ही क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करून पाकिस्तानचा प्रयत्न विफल ठरवला आहे.

मात्र, पाकिस्तानने थेट विमानतळावर हल्ला करणे म्हणजे उघडपणे युद्ध पुकारणे असल्याचे मत संरक्षण विषयक तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. 

आज संध्याकाळी जम्मू विमानतळाकडे पाकिस्तानकडून आठ क्षेपणास्त्र डागण्यात आली. मात्र एस 400 हवाई सुरक्षा यंत्रणेने ती वाटेतच निकामी करून टाकली आहेत. त्यामुळे जम्मू विमानतळ आणि परिसर पूर्णपणे सुरक्षित आहे. जम्मू कश्मीर प्रमाणेच पाकिस्तानकडून राजस्थानातील जैसलमेर, बारमेर आणि पंजाबच्या सीमावर्ती भागातही ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. 

हे पण वाचा  लाहोरमध्ये सकाळीच तीन शक्तिशाली स्फोट

About The Author

Advertisement

Latest News

Advt