पाकिस्तानात हाहा:कार, कराची बेचिराख
इस्लामाबाद, रावळपिंडीसह अनेक शहरांची गेली रया
नवी दिल्ली: प्रतिनिधी
काल संध्याकाळी भारताच्या विविध लष्करी तळांवर हल्ले करून पाकिस्तानने काढलेल्या कुरपतीचे अपेक्षेपेक्षा अधिक वाईट फळ पाकिस्तानला भोगावे लागले आहे. कराची बंदर विमानतळ झाले असून राजधानी इस्लामाबाद आणि रावळपिंडी सह अनेक शहरांची भारताच्या हवाई हल्ल्याने दुर्दशा झाली आहे.
भारतीय हवाई दलासह कराची कडे डोळे वटारून उभे असलेल्या आयएनएस विक्रांतचे रुद्र रूप पाकिस्तानला बघायला मिळाले. आर्थिक दुरवस्थेमुळे आधीच मदतीसाठी वणवण फिरणाऱ्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कराची बंदराचा आयएनएस विक्रांत आणि केलेल्या हल्ल्यात सर्वनाश झाला आहे. त्याचप्रमाणे इस्लामाबाद, रावळपिंडीसह पाकिस्तानातील सर्व मोठ्या शहरांमध्ये भारतीय क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या हल्ल्याने हाहा:कार माजवला आहे.
चीनकडून मिळालेल्या शस्त्रांच्या आधारावर भारतात रक्ताचे पाट वाहवण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानला तोंडावर आपटावे लागले आहे. पाकिस्तानने भारताविरुद्ध वापरलेल्या एकूण एक ड्रोन, क्षेपणास्त्र आणि लढाऊ विमानांचा भारत आणि पाडाव केला. पाकिस्तानच्या या हल्ल्यामुळे भारतातील जमिनीवर साधा ओरखडा देखील उठला नाही. मात्र, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत आणि केलेल्या प्रतिहल्ल्यात निम्मा पाकिस्तान बेचिराख झाला आहे.
अशा परिस्थितीत भाव चढलल्या पाकिस्तानने केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी हे संकट संपूर्ण देशावर उडवून घेणारे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांची पदावरून हकालपट्टी करून त्यांना अटक केले आहे. खुद्द पंतप्रधान शहाबाज यांनी बंकरचा आश्रय घेतला आहे. त्यांच्या आपत्कालीन बैठका देखील बंकर मध्येच होत आहेत.
अशा परिस्थितीत काल मध्यरात्री पाकिस्तानचा मित्र असलेल्या तुर्कीए या देशाचे मालवाहू विमान पाकिस्तानात उतरले. त्यातून कदाचित त्यांना ड्रोनचा पुरवठा झाला असल्याची शक्यता आहे. मात्र, एकंदरीत पाकिस्तानने हे संकट ओढवून घेतलेले असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान एकाकी पडला आहे. एकीकडे भारतीय शस्त्र पाकिस्तानला भाजून काढत असताना अमेरिकेने पाकिस्तानला तंबी दिली. ऑपरेशन सिंधू हा भारताचा अधिकार होता. तो त्यांनी पार पाडला. आता त्याला उत्तर देऊन आशियातील परिस्थिती बिघडवू नका, असे अमेरिकेने पाकिस्तानला स्पष्ट सुनावले. त्याचवेळी शाहबाज शरीफ यांनी मदतीच्या अपेक्षेने युरोपियन युनियनच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. चीनने पाकिस्तानला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करून आधीच काय ती मदत केलेली आहे. आता चीन देखील या युद्धाची व्याप्ती न वाढवता संवादातून मार्ग काढला पाहिजे, अशी भूमिका मांडू लागला आहे. त्यामुळे पाकिस्तान समोर असलेल्या संकटात सातत्याने वाढ होत आहे.