मोठ्या स्फोटकांसह पाकिस्तानी दहशतवादी भारतात

मुंबई पोलिसांच्या व्हाट्सअँपवर दहशतवादी हल्ल्याची धमकी

मोठ्या स्फोटकांसह पाकिस्तानी दहशतवादी भारतात

मुंबई: प्रतिनिधी 

पाकिस्तानातून 14 दहशतवादी 400 किलो आरडीएक्ससह भारतात दाखल झाले असून गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठे स्फोट घडवून आणण्याची धमकी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या व्हाट्स ॲपवर देण्यात आली आहे. या प्रकाराची चौकशी मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे. 

गणेश विसर्जन हा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा उत्सव आहे. एकाच वेळी मनाला लागणारी हुरहुर आणि ओसंडून वाहणारा उत्साह गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या निमित्ताने मोठा जनसागर रस्त्यावर उतरतो. त्यामुळे या काळात स्फोट घडवून मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण करण्याचा पाकिस्तानी कट असल्याचे या धमकीवरून दिसून येत आहे.

पोलिसांकडून या धमकीची खातरजमा केली जात असून तांत्रिक आणि खबऱ्यांच्या माध्यमातून या धमकीमागील वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. त्याचप्रमाणे मिरवणुकीचे निमित्ताने कडेकोट बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे.

हे पण वाचा  आम्ही शांत आहोत, शांत राहू द्या!

About The Author

Advertisement

Latest News

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार अर्थसहाय्य मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार अर्थसहाय्य
मुंबई: प्रतिनिधी  मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनानुसार मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याचे...
छगन भुजबळ हे भाजपचे प्यादे: संजय राऊत
'हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घाईने आणि दबावाखाली'
'... तर दोन समाजांमध्ये लागतील भांडणे'
मोठ्या स्फोटकांसह पाकिस्तानी दहशतवादी भारतात
केवळ परिस्थिती चिघळू नये म्हणून...
'अजित पवार यांना नाही सत्तेत राहण्याचा अधिकार'

Advt