सीएफए इन्स्टिट्यूटतर्फे फायनान्स इंडस्ट्री नेटवर्क राउंडटेबलचे आयोजन

शिक्षण आणि उद्योग भागीदारी मजबूत करण्यावर भर

सीएफए इन्स्टिट्यूटतर्फे फायनान्स इंडस्ट्री नेटवर्क राउंडटेबलचे आयोजन

पुणे: प्रतिनिधी 

गुंतवणूक व्यावसायिकांचे जागतिक संघटन असलेल्या सीएफए इन्स्टिट्यूट ने आज पुण्यात फायनान्स इंडस्ट्री नेटवर्क (एफआयएन) राउंडटेबलचे आयोजन केले. या कार्यक्रमात प्रदेशातील नामांकित विद्यापीठे आणि महाविद्यालयांचे वरिष्ठ प्राध्यापक सहभागी झाले होते. या निमित्ताने फायनान्स शिक्षण गुंतवणूक व्यवस्थापन उद्योगाच्या वेगाने बदलणाऱ्या गरजांशी अधिक चांगल्या पद्धतीने कसे जुळवून आणता येईल, यावर चर्चा करण्यात आली.  

या फायनान्स इंडस्ट्री नेटवर्क राउंडटेबलने शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञ यांच्यात संवाद साधण्यासाठी एक खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यामध्ये कौशल्यातील दरी कमी करणे, विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढवणे आणि उद्योग–शिक्षण सहयोग अधिक मजबूत करणे यावर चर्चा झाली. तसेच चर्चेत  वित्तीय क्षेत्रातील नव्या घडामोडी, विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे ज्ञान देण्यात सीएफए प्रोग्रामची भूमिका आणि गुंतवणूक व्यवस्थापन क्षेत्रात यशस्वी करिअरसाठी नव्या पिढीला तयार करण्याच्या संधींवर देखील लक्ष केंद्रित करण्यात आले.

सीएफए इन्स्टिट्यूटतर्फे बोलताना सीनियर युनिव्हर्सिटी रिलेशन्स स्पेशालिस्ट सॅम फकीह म्हणाले: “सीएफए इन्स्टिट्यूटमध्ये फायनान्स क्षेत्राचे भविष्य घडवण्यात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. पुण्यात फायनान्स इंडस्ट्री नेटवर्क सत्राचे आयोजित करताना आम्हाला आनंद होत आहे. या माध्यमातून प्रख्यात प्राध्यापकांना एकत्र आणून शैक्षणिक ज्ञान आणि उद्योगातील सुसंगती अधिक मजबूत करण्याच्या आमच्या ध्येयाला बळकटी मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक, जागतिक दर्जाच्या आणि वास्तवाशी निगडित मार्गदर्शन मिळू शकते.”

कार्यक्रमात बोलताना डॉ. अर्चना सिंह, एचओडी – फायनान्स, डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूल यांनी सांगितले:“या राउंडटेबलमुळे सध्याच्या उद्योगातील घडामोडी आणि भविष्यातील फायनान्स व्यावसायिकांकडून असलेल्या अपेक्षांबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूल, डीवायपी डीपीयू मध्ये आम्हाला सीएफए इन्स्टिट्यूट सोबतच्या आमच्या धोरणात्मक सहकार्याचा अभिमान आहे, ज्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना आधीपासूनच जागतिक दर्जाच्या पद्धती आणि उच्च व्यावसायिक मानके शिकण्याची संधी मिळत आहे. अशा कार्यक्रमांमुळे शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यातील दुवा अधिक मजबूत होतो आणि आम्ही अशा सहकार्यांना अधिक बळकट करण्यास कटिबद्ध आहोत, जेणेकरून आमचे विद्यार्थी जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक फायनान्स क्षेत्रात उत्तम प्रकारे प्रगती करू शकतील.”  

सीए बिपिन पलांडे, असोसिएट डीन – अकॅडेमिक्स, एमआयटी डब्ल्यूपीयू स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स, म्हणाले: “सीएफए इन्स्टिट्यूट सोबतच्या फायनान्स इंडस्ट्री नेटवर्क राउंडटेबलमध्ये सहभागी होणे हा एक उत्तम अनुभव होता. या चर्चांमुळे केवळ सीएफए चार्टरच्या प्रवासाबद्दल माहिती मिळाली नाही, तर गुंतवणूक व्यवस्थापन उद्योग कसा बदलत आहे हेही समजले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे आणि प्राध्यापकांच्या दृष्टिकोनातून सीएफए प्रोग्राम समजून घेणे यामुळे हे सत्र खूपच उपयुक्त ठरले. अशा कार्यक्रमांमुळे सीएफए इन्स्टिट्यूट, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांसाठी नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध होतील. एमआयटी डब्ल्यूपीयू स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड कॉमर्सला या उपक्रमाचा भाग असल्याचा अभिमान वाटतो.”  

भारतामधील वित्तीय कौशल्य विकसित करण्यात जागतिक मानकांची भूमिका अधोरेखित करताना डॉ. मंजू चोप्रा, हेड – स्कूल ऑफ बिझनेस अँड मॅनेजमेंट, डायरेक्टर अॅडमिशन्स, डीईएस पुणे युनिव्हर्सिटी, म्हणाल्या:“सीएफए प्रोग्राम हे गुंतवणूक व्यवस्थापन आणि जागतिक मानकांवर केंद्रित असलेल्या विस्तृत अभ्यासक्रमामुळे शैक्षणिक संस्था आणि उद्योग दोघांसाठीही महत्वाचे आहे. हे एक प्रमाणित चौकट प्रदान करते जे व्यावसायिक कौशल्ये आणि ज्ञान वाढवते. शिक्षण आणि व्यावसायिक सराव यांच्यातील हे एकत्रीकरण जागतिक स्तरावर स्पर्धात्मक फायनान्स कर्मचारी वर्ग तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सीएफए इन्स्टिट्यूट सोबत या महत्त्वाच्या चर्चेत सहभागी होण्याचा आम्हाला आनंद झाला आहे.”

राउंडटेबलचा समारोप एका संवादात्मक नेटवर्किंग सत्राने झाला, ज्यामध्ये सहभागी सदस्यांना सहकार्याच्या नव्या संधी शोधण्यास, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाच्या संधी निर्माण करण्यास आणि भारतातील फायनान्स शिक्षण पुढे नेण्यासाठी विचार मांडण्यास प्रोत्साहन देण्यात आले. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt