राज्यात ₹१ लाख ०८ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार

उपलब्ध होणार तब्बल ४७ हजार रोजगार

राज्यात ₹१ लाख ०८ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात उद्योग, माहिती तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया, गोदामे, डेटा सेंटर व लॉजिस्टिक हब यांसारख्या प्रकल्पांसाठी तब्बल ₹१ लाख ८ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार (MoU) करण्यात आले असून, याद्वारे राज्यात सुमारे ४७ हजार रोजगारनिर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. हे करार सह्याद्री अतिथीगृह येथे फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “उद्योग व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार नेहमीच तत्पर आहे. महाराष्ट्रात गुंतवणुकीचा सकारात्मक अनुभव मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे.”

महत्वाच्या करारांमध्ये :

हे पण वाचा  जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसाठी आरक्षण जाहीर

  • रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कडून नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे खाद्यपदार्थ व पेयांच्या एकात्मिक सुविधा प्रकल्पासाठी ₹१,५१३ कोटींची गुंतवणूक, ५०० रोजगार.

  • एमजीएसए रिअ‍ॅलिटी कडून राज्यातील विविध ठिकाणी औद्योगिक गोदामे, डेटा सेंटर व लॉजिस्टिक हब उभारणीसाठी ₹५,००० कोटींची गुंतवणूक, १०,००० रोजगार.

  • लोढा डेव्हलपर्स लिमिटेड कडून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे ‘ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क’साठी ₹३०,००० कोटींची गुंतवणूक, ६,००० रोजगार.

  • अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कडून नागपूर जिल्ह्यातील लिंगा-कलमेश्वर येथे एकात्मिक पृष्ठभाग कोळसा वायूकरण व डाउनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ह प्रकल्पासाठी ₹७०,००० कोटींची गुंतवणूक, ३०,००० रोजगार.

  • पॉलीप्लेक्स कार्पोरेशन लिमिटेड कडून नंदुरबार येथे पॉलिमेरिक उत्पादनांच्या प्रकल्पासाठी ₹२,०८६ कोटींची गुंतवणूक, ६०० रोजगार.

या करारांवर लोढा डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक लोढा, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे कार्यकारी संचालक केतन मोदी, अदानी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष अजित बरोदिया आणि पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशनचे मुख्य कार्याधिकारी प्रणय कोठारी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

About The Author

Advertisement

Latest News

Advt