'केवळ सर्वात श्रीमंत संघटना असणे पुरेसे नाही'

वेंगसरकर यांनी बीसीसीआयला सुनावले खडे बोल

'केवळ सर्वात श्रीमंत संघटना असणे पुरेसे नाही'

मुंबई: प्रतिनिधी

आयपीएल स्पर्धांचे आयोजन आणि सामन्यांच्या प्रसारण हक्कातून मिळणारा पैसा हे आपले एकमेव उद्दिष्ट नाही, अशा कठोर शब्दात भारताचे महान फलंदाज आणि निवडकर्ते दिलीप वेंगसरकर यांनी भारतीय क्रिकेट नियमक मंडळ आणि निवड समितीला धारेवर धरले आहे. खेळाडू आणि कर्णधार घडविण्यासाठी तुम्ही काहीही प्रयत्न केले नाहीत, असे खडे बोलही त्यांनी सुनावले.

कसोटी विश्वचषक अजिंक्यपद पटकावण्यात अपयश आल्यानंतर भारतीय क्रिकेटवर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. बहुतेक वेळी टीकेच्या केंद्रस्थानी कर्णधार राहुल शर्मा हाच राहिला आहे. वेंगसरकर यांनी मात्र भारतीय क्रिकेटच्या दुरवस्थेला बीसीसीआय आणि निवड समितीला जबाबदार धरले आहे.

केवळ जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असणे एवढेच पुरेसे नाही. खेळाडूंची पर्यायी फळी तयार करण्यासाठी बीसीसीआय आणि निवड समितीने काहीही केले नाही. आला खेळाडू की खेळवा त्याला, असेच मागील काही काळापासून धोरण राहिले आहे, अशी टीकाही वेंगसरकर यांनी केली.

मागील पाच, सहा वर्षांच्या कालावधीत निवड समितीच्या सदस्यांमध्ये खेळाडूंना पारखण्याची दृष्टी दिसून येत नाही. त्याचप्रमाणे क्रिकेटविषयी सखोल जाण असल्याचेही दिसत नाही. त्यामुळे निवड समितीनेही खेळाडू किंवा पर्यायी कर्णधार घडविण्यासाठी पुढाकार घेतला नाही, असेही वेंगसरकर म्हणाले.

About The Author

Related Posts

Advertisement

Latest News

मावळ तालुक्यातील उद्यान विकासासाठी ४ कोटींचा निधी मावळ तालुक्यातील उद्यान विकासासाठी ४ कोटींचा निधी
वडगाव मावळ/ प्रतिनिधी मावळ तालुक्यातील नागरी भागातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. तालुक्यातील नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील उद्यानांच्या विकासासाठी ‘नमो उद्यान’...
धर्मवीरांना सामूहिक तर्पणः अरुंधती फाऊंडेशनतर्फे विशेष कार्यक्रम
'रोम जळत आहे आणि निरो... '
'बंजारा समाजाला आदिवासी करणे अयोग्य'
कोणत्या अधिकारात रोखली अनधिकृत बांधकामावरील कारवाई?
कोथरूड येथे क्षुल्लक कारणावरून गोळीबार
अर्चना कुटे यांच्याकडून अडीच कोटींचा मुद्देमाल हस्तगत

Advt