वसंत साळवे यांचा वाढदिवस महत्त्व पूर्ण व्याख्यानाने साजरा...

वसंत साळवे यांचा वाढदिवस महत्त्व पूर्ण व्याख्यानाने साजरा...

वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते वसंत साळवे यांचा वाढदिवस "महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा आणि नागरिकांच्या पुढील आव्हाने" या विषयावर व्याख्यानाने सावित्रीबाई फुले सभागृह, महात्मा फुले पेठ, पुणे येथे साजरा करण्यात आला या सदर व्याख्यानाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव एडवोकेट प्रियदर्शी तेलंग व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष फारुख अहमद यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एडवोकेट अरविंद तायडे होते कार्यक्रमाचे संयोजन वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर संघटक नागेश भोसले यांनी केले होते.

सदर व्याख्यानाला भरभरून प्रतिसाद मिळाला वसंतदादा यांना मानणारे पुणे शहर जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते त्या सर्व कार्यकर्त्यांनी वसंतदादा यांना भेटून शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर अशा प्रकारचे व्याख्यान केल्यामुळे लोकांनी संयोजकाचे आभार मानले आणि हा जो महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा येवू घातलेला आहे त्याच्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम केल्याबद्दल आहे त्याच्याबद्दल सर्वांनी आभार समाधान व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन वाड्या वस्त्यांमध्ये आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी अहोरात्र निस्वार्थ भावनेने कार्य करणारे वसंतराव साळवे हेच खरे आंबेडकरी चळवळीचे ऊर्जा स्त्रोत आहे असे गौरवोद्गार व्याख्याते फारूक अहमद यांनी काढले. सत्काराला उत्तर देताना साळवे म्हणाले की, सध्या स्वतःच्या कवड्या स्वतःच्या हातात ठेवून लढले पाहिजे स्वतःच्या कवड्या इतरांकडे दिल्या तर त्या कवडीमोल झाल्याशिवाय राहणार नाहीत आपल्यातील आंबेडकरी बाणा हा शेवटपर्यंत तेवत ठेवला पाहिजे.

या प्रसंगी सुरेखा साळवे, रोहिदास गायकवाड, अंकल सोनवणे, एडवोकेट मोहन वाडेकर, शैलेंद्र चव्हाण, जांबुवंत मनोहर, राहुल नागटिळक, श्याम गायकवाड, सुजित यादव, बाळासाहेब वाघमारे, विश्वास गदादे पाटील, विकास भेगडे पाटील, अनिता चव्हाण, बाबासाहेब गायकवाड व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सिने दिग्दर्शक संतोष संखद यांनी केले तर आभार राजेंद्र कांबळे यांनी मानले.

हे पण वाचा  शेतकऱ्याप्रमाणे " शेतकरी " मासिक आत्महत्येच्या वाटेवर

000

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

मावळ तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत जाहीर; मावळ तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत जाहीर;
वडगाव मावळमध्ये आगामी पंचवार्षिक ग्रामपंचायतीचा सरपंच पदाच्या आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये महिलाराज अधिक असलेले दिसून आले आहे. आरक्षणामुळे अनेकांचा...
चीनमधून होणारी बेदाण्याची बेकायदेशीर आयात थांबवा
'अजित पवार महाजातीयवादी आणि दरोडेखोर'
'वाढत्या महिला अत्याचारांवर तातडीने लक्ष देण्याची गरज'
करवाढीच्या निषेधार्थ हॉटेल, रेस्टॉरंटचा १४ जुलै रोजी बंद
'श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस हे दबावतंत्र?'
ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी शहा शिंदे यांच्यात खलबते

Advt