भीमनगरवासीयांचा मंत्री पाटील यांच्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा

झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली बिल्डरने फसविल्याचा आरोप

भीमनगरवासीयांचा मंत्री पाटील यांच्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा

पुणे: प्रतिनिधी

एरंडवणा येथील शीलाविहार कॉलनीमधील भीमनगर वसाहतीच्या पुनर्वसनामध्ये बिल्डर कडून फसवणूक झाली आहे. या कडे लक्ष वेधून  घेण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी स्थानिक आमदार व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर शनिवारी भीमनगरवासियांचा बिऱ्हाड मोर्चा धडकला. 

रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या बिऱ्हाड मोर्चात देवीदास ओव्हाळ, जावेद शेख, हरी बागडे,  सुनिल डमरे,  दादू गायकवाड,  सुदाम शिंदे, उमा साठे, स्नेहल गायकवाड,  रेश्मा पल्ला,  रईसा शेख,  निशिकांत पोळ,  प्रतीक डंबाळे,  प्रभू सुनगर,  सिकंदर मुलाणी यांच्यासह स्थानिक रहिवासी सहभागी झाले होते. 

भीम नगर येथील 216 कुटुंबीयांचे पुनर्वसन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मार्फत करण्याचा बोगस प्रस्ताव भक्ती एंटरप्राइजेस मार्फत दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भामध्ये यापूर्वीच बिल्डरसह 20 जणांविरुद्ध कोथरूड पोलीस ठाणे येथे फसवणूक व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच योजनेच्या मंजुरीसाठी स्थानिक मूळ रहिवाशांऐवजी बाहेरची बोगस लाभार्थी तयार करण्याचा गंभीर प्रकार बिल्डर कडून करण्यात आलेला आहे व त्याद्वारे स्थानिक नागरिकांना भीमनगरपासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर सक्तीने पुनर्वसन करण्याचा घाटही सध्या बिल्डरने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारणामार्फत घातलेला आहे.  हा अन्याय असल्याने याविरुद्ध भीम नगर झोपडपट्टी धारक मोठ्या प्रमाणात संघर्ष करत आहेत. 

हे पण वाचा  Heavy Rains In Maharashtra | पावसानं झोडपल्यानं भाजीपाल्याला महागाईची फोडणी? शेतकरी हैराण, ग्राहकांची दाणादाण!

यावेळी बोलताना राहुल डंबाळे म्हणाले, झोपडपट्टीधारकांची एसआरएच्या नावाखाली होत असलेली लुबाडणूक व फसवणूक याचे उत्तम उदाहरण म्हणून भीमनगरकडे पाहता येईल. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी शहरातील सर्व झोपडपट्टीधारकांनी व त्यांच्या संस्था, संघटनांनी एकत्रित लढा उभारावा. सक्तीचे पुनर्वसन रद्द करून आम्हाला आहे त्या ठिकाणी राहू द्यावे व त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे, अशी विनवणी पाटील यांच्याकडे करण्यात आल्याचे डंबाळे यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील नियोजित कार्यक्रमामुळे सांगली येथे असल्याने त्यांचे निवेदन पाटील यांचे स्वीय सहाय्यक राहुल देशपांडे यांना देण्यात आले.

About The Author

Advertisement

Latest News

दुय्यम निबंधक कार्यालयाच्या स्थलांतराबाबत उपोषणामुळे बसलेल्या कार्यकर्त्यांची तब्येत खालावली! दुय्यम निबंधक कार्यालयाच्या स्थलांतराबाबत उपोषणामुळे बसलेल्या कार्यकर्त्यांची तब्येत खालावली!
नारायणगाव   नारायणगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित होऊ नये तसेच ते वारूळवाडी गावच्या हद्दीतच राहावे यासाठी वारूळवाडी येथे उपोषण सुरू...
पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घ्यावा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मातंग समाजाच्या मागण्यांवर लवकरच निर्णय - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पैशाच्या लोभासाठी क्रौर्याची परिसिमा!
सन्मानजनक मानधनासाठी ज्युनिअर आर्टिस्ट आक्रमक
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अमेरिकन न्यायालयाने लावला चाप
दुष्काळग्रस्त गरजू विद्यार्थ्यांची यादी सरकारने मागवली

Advt