सोमवारी पाटणकर गटाची महत्त्वाची बैठक
On
पाटण / प्रतिनिधी
सोमवार दि. २६ मे २०२५ रोजी पाटण येथे पाटणकर गटाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. आगामी राजकीय ध्येयधोरणे ठरवण्यासाठी व राजकीय, सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आल्याने पाटणकर गटातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीस आवर्जून उपस्थित रहावे अशी माहिती माजी पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे .
या प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार ही बैठक पाटणकर गटाचे सर्वेसर्वा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम मंदिर, पाटण तेथे दुपारी १२:३० वा. पार पडणार आहे. या बैठकीस सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर व युवा नेते याज्ञसेन पाटणकर हे सुध्दा उपस्थित असणार आहेत. तरी सर्व संस्थाचे चेअरमन, व्हॉ.चेअरमन, संचालक, प्रमुख पदाधिकारी, आजी/माजी जिल्हा परिषद सदस्य, आजी/माजी पंचायत समिती सदस्य, आजी/माजी नगराध्यक्ष, उप नगराध्यक्ष, नगरसेवक/नगरसेविका, आजी/माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला, युवती व युवा कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शेलार यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
000
Tags:
About The Author
Latest News
31 May 2025 16:54:31
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुशल प्रशासक व पराक्रमी राज्यकर्ती म्हणून परिचित असलेल्या आणि इतिहासाच्या कालपटावर स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा...