" नैसर्गिक मार्गाने मधुमेहावर मात " पुस्तक प्रकाशन
मुंबई / रमेश औताडे
डॉ. विजय चिल्ले लिखित " नैसर्गिक मार्गाने मधुमेहावर मात " या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई प्रेस क्लब येथे एका विशेष समारंभात करण्यात आले. मधुमेहासारख्या वाढत्या जीवनशैलीजन्य आजारावर नैसर्गिक आणि औषधमुक्त उपायांची शास्त्रशुद्ध मांडणी या पुस्तकात करण्यात आली आहे.
रिव्हर्सिंग डायबिटीज नॅचरली असे नाव असलेली इंग्रजी भाषेतील आवृत्ती आता प्रकाशित होत असताना प्रकाशन समारंभाला वैद्यकीय क्षेत्रातील उदय चिले, आरोग्यविषयक वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुस्तकात डॉ. विजय चिल्ले यांनी आधुनिक विज्ञान आणि पारंपरिक आरोग्य पद्धती यांचा समन्वय साधत, मधुमेह उलटवण्यासाठी आहारनियंत्रण, नियमित व्यायाम, योग, ध्यानधारणा आणि मानसिक आरोग्य यांचे महत्व विशद केले आहे. औषधांवर अवलंबून न राहता जीवनशैलीत योग्य बदल करून मधुमेह नियंत्रणात आणण्याची प्रेरणा हे पुस्तक देते.
यावेळी बोलताना डॉ. चिल्ले म्हणाले, “मधुमेह हा आयुष्यभराच्या औषधांचा आजार नसून, तो योग्य मार्गाने नियंत्रणात आणता येतो, अगदी उलटताही येतो. या पुस्तकात मी माझ्या वैद्यकीय अनुभवातून सिद्ध झालेले मार्ग दिले आहेत, जे वाचकांना नक्कीच उपयोगी पडतील. या पुस्तकाचे प्रकाशन आरोग्यप्रेमींसाठी नवी दिशा ठरणार असल्याची भावना यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.
000