मोकाट आरोपी गजाआड करावेत - नारायण बागडे
On
मुंबई / रमेश औताडे
आई सह दोन निष्पाप बालकांना जिवंत जाळल्याची धक्कादायक मन सुन्न करणारी घटना रांजणगाव गणपती तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे घडली. त्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापना करून खरे मोकाट आरोपी गजाआड करावेत अशी मागणी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केली आहे.
महिलेच्या हातावर जय भीम गोंदलेले असल्याने जातीय द्वेष भावनेने हे कृत्य तर करण्यात आले नाही ना ? अशी शंका निर्माण झाली आहे. महिलेचे वय अंदाजे २५ वर्ष असून लहान मुलांचे वय अंदाजे ४ वर्षं व दीड वर्ष आहे या तिहेरी हत्याकांडाने पुणे सह संपूर्ण राज्यभरात रोष व्यक्त होत आहे. आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा पुणे येथील पदाधिकारी कविता घाडगे घटनास्थळी जाऊन आल्या असून पुणे पोलीस अधीक्षक यांच्या कडे चौकशीचा अहवाल मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
000
Tags:
About The Author
Latest News
29 May 2025 19:12:03
नारायणगाव
नारायणगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित होऊ नये तसेच ते वारूळवाडी गावच्या हद्दीतच राहावे यासाठी वारूळवाडी येथे उपोषण सुरू...