- राज्य
- पुणे-मुंबई महामार्गावर कार जळून खाक, वडगाव मावळ येथील घटना,
पुणे-मुंबई महामार्गावर कार जळून खाक, वडगाव मावळ येथील घटना,
सुदैवाने जिवीतहानी नाही; कार पूर्णतः जळून खाक झाली
वडगाव मावळ प्रतिनिधी
जुना मुंबई पुणे महामार्गावर वडगाव नगरपंचायत हद्दीत पुण्याच्या दिशेने निघालेल्या कारने अचानक पेट घेतला.चालकाने प्रसंगावधान राखत कार बाजूला घेतल्याने सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. मात्र कार पूर्णतः जळून खाक झाली
गुरूवार (दि ३) सायंकाळी ६:१० वाजण्याच्या सुमारास जुना मुंबई पुणे महामार्गावर हॉटेल शितल समोर वडगाव मावळ जि.पुणे हि घटना घडली.
पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची इरटिका (एम एच ४२ बी.बी.४४६५) दोन इसम गाडी घेऊन पुण्याच्या दिशेने जात होते. शॉर्टसर्किट झाल्याने अचानक गाडीने पेट घेतला. मात्र तत्पूर्वी दोघांना गाडीतून सुखरूप बाहेर पडण्यात यश आले.
वडगाव मावळ नगरपंचायत तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशामक दलाचे लीडिंग फायरमॅन ताहीर मोमीन,वाहन चालक समीर दंडेल प्रदीप तुमकर विनोद ढोरे रियाज मुलानी धीरज शिंदे भास्कर माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली अग्निशामक बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. या घटनेनंतर महामार्गावर सुमारे अर्धा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार खोपडे व पोलीस कर्मचारी गणपत होले कॉन्स्टेबल राक्षे यांनी वाहतूक कोंडी नियंत्रणात आणली.
About The Author
