दुगड ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान

दहा हजार शबनम बॅग व साड्यांचेही वाटप

दुगड ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान

पुणे: प्रतिनिधी 

आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम आहे. दरवर्षी प्रमाणे पुण्यातील दुगड ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांचे यंदाही जोरदार स्वागत करण्यात आले.  

या विषयी माहिती देताना गौरव प्रमोद दुगड म्हणाले, दुगड ग्रुप आणि पुष्पा स्टील च्या वतीने मागील 25 वर्षा हून अधिक काळ वारकऱ्यांची सेवा करण्यात येते. कै.माणिकशेठ दुगड यांनी सुरू केलेला सेवेचा वारसा प्रमोद दुगड आणि आता मी व माझी पत्नी मोनल दुगड नेटाने चालवण्याचा प्रयत्न करत आहोत.आज दहा हजार वारकऱ्यांना शबनम बॅग वाटप करण्यात आल्या आहेत. महिला वारकऱ्यांना साड्याही वाटप करण्यात आल्या.

याशिवाय दरवर्षी प्रमाणे 500 हून अधिक वारकऱ्यांसाठी पंढरपूर ला जाईपर्यंत पुरेल अशी शिदोरी देण्यात आली आहे, यामध्ये गडू, तांदूळ, साखर, गूळ, शेंगदाणे, साबुदाणा, गुडदाणी, बिस्किट आदिचा समावेश आहे. समाजाचे आपण देणे लागतो आणि वारकऱ्यांच्या रूपाने आपल्या शहरात आलेल्या विठ्ठला चरणी सेवा करण्याची संधी म्हणून आम्ही दरवर्षी विविध उपक्रम राबवत असतो असेही दुगड यांनी सांगितले.

हे पण वाचा  दिव्या देशमुखवर अभिनंदनाचा वर्षाव

About The Author

Advertisement

Latest News

'हिंदीसक्तीचा आग्रह  धरणाऱ्या मुख्यमंत्र्यांना भूमिपुत्रांचा मात्र विसर' 'हिंदीसक्तीचा आग्रह धरणाऱ्या मुख्यमंत्र्यांना भूमिपुत्रांचा मात्र विसर'
नवी मुंबई: प्रतिनिधी  लहान मुलांवर हिंदी शिकण्याची सक्ती लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भूमिपुत्रांच्या हिताचा मात्र विसर पडला...
नव्या कृषीमंत्र्यांनी देखील केली वादग्रस्त विधानाने सुरुवात
'साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे आणि भारताला हिंदुराष्ट्र घोषित करावे'
'काँग्रेसने हिंदूंची व भारतीय जनतेची माफी मागावी'
महसूल सप्ताहात नागरिकांनी सहभागी व्हावे- प्रांतअधिकारी सुरेंद्र नवले 
तपासयंत्रणांवरच न्यायालयाने उगारला कायद्याचा बडगा
'भगवा किंवा उजवा दहशतवाद अस्तित्वात नाही'

Advt