वडूथयेथील पुलाचा 180 वा वाढदिवस साजरा
सातारचे शहाजी राजे यांच्या औदार्याने 30 जून 1845 रोजी आणला सेवेत
पुलाची झालीया दुरावस्था, पुल जतन करावा याची मागणी
सातारा, प्रतिनिधी
सातारा तालुक्यातील वडूथ 180 वा वाढदिवस दि. 30 जुन रोजी साजरा होत आहे. या पुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यापरिसरातील स्थानिकांनी नवे पुल बांधून द्यावेत वजूने जतन करावेत , अशी मागणी केली जात आहे. हे दोन्ही पुल दि. 30 जुन 1845 साली लोकांच्या सेवेत आले होते. हे पुल सातारचे शहाजीराजे यांच्या औदार्याने बांधल्याचे त्या पुलावरील दगडावर स्पष्ट उल्लेखकेलेला आहे. तसेच पुलावरील माहिती देणारा दगड 1853 च्या महापुरात वाहून गेला होता.
पुणे जिह्यात इंद्रायणी नदीवरील साकव पुल वाहून गेल्यानंतर राज्य पुलाबाबत चर्चा सुरु झाल्या होत्या. त्याचवेळी साताऱ्याचा संगममाहुलीचा पुलही चर्चेत आला होता. संगम माहुलीच्या पुलाला 110 वर्ष झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. नव्या पुलांचे बांधकामधिम्या गतीने सुरु आहे. दरम्यान, सातारा तालुक्यातील वडूथ आणि वाढे हे दोन्ही पुल कृष्णा आणि वेण्णा नदीवर बांधले गेलेले आहेत. हे दोन्ही पुल नेहमी चर्चेचा विषय बनत असतात. त्या पुलावर अनेकदा आंदोलनेही केलेली आहेत. पुलावर खड्डे पडलेले असतात. अपघात होत असतात. आता हे दोन्ही पुल दि. 30 जुन रोजी 180 वर्षाचे होत आहेत. त्या पुलावरच्या पाटीवर पुल सेवेत आल्याचीतारीख 30 जुन 1845 अशी आहे. त्याबाबतची माहिती स्थानिक ग्रामस्थ मदन साबळे यांनी दिली.
हा पुल सातारचे शहाजीराजे यांच्या औदार्याने सेवेत आणण्यात आला तर 1857 रोजी नदीला आलेल्या महापुरात माहिती देणारा दगडवाहून गेला.पुन्हा माहिती देणारा दगड लावण्यात आला असल्याचा उल्लेख आढळून येतो आहे. दरम्यान, त्या पुलाच्या भिंतीवर झाडीवाढली आहे. त्यावर पडलेले मोठ मोठे खड्डे आहेत. वाढे पुलावर तर पावसाळ्यात पाणी साठत असते. त्यामुळे पुलावर चिखलाचाराडाराडा झालेला असतो. पावसाळ्यात वाहन चालकांना वाहन चालवणे अवघड होत असते. वाढे फाटा पासून व वाढे गावातून पावसाचेयेणारे पाणी पुलावरच येत असते. सध्या वाढे येथील पुलाचे ऑडिट स्ट्रक्चर होणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालूनया पुलावरील अवजड वाहतूक बंद करावी, अशी मागणी भाजप युवा सचिव मदन साबळे ,महेश साबळे, सुहास साबळे ऊपसरपंचवडूथ, अभिजित साबळे ग्रा.पं सदस्य, साईराज कदम, रोहित गायकवाड, सरपंच आराळे, राजेंद्र कदम, मनोज साबळे, प्रशांत वाघमाळे, अनिल साबळे, हरिदास मोरे, अरुण गुरव, लीलधर घाडघे, मनोज वाघमळे.
000