- राज्य
- शर्मिला राजेश ननावरे यांना 'योगरत्न' पुरस्कार
शर्मिला राजेश ननावरे यांना 'योगरत्न' पुरस्कार
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने सन्मान
पिंपरी: प्रतिनिधी
येथील सुप्रसिद्ध योग शिक्षिका शर्मिला राजेश ननावरे यांना मानाचा योगरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, ए जी एम ए, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) डॉक्टर सेल आयुष विभाग यांच्या वतीने हा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे देण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ बाळासाहेब पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून उपस्थित होते. सोबत पाहुण्यांमध्ये उद्योजक मनोज दांडगे, डॉ नितीन राजे पाटील आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व्हाईस चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल प्रदेश कार्याध्यक्ष (आयुष विभाग), डॉ सतीश कराळे, चेअरमन आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, डॉक्टर डॉ बाबुराव कानडे अध्यक्ष आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, दिशा चव्हाण, प्रशांत सावंत, प्रा कुणाल महाजन, मनोहर कानडे व आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
या मानाच्या पुरस्कारासाठी शर्मिला ननावरे यांचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे व शुभेच्छाच्या वर्षाव होत आहे.