Mhaswad, Satara I म्हसवड पालिका विरोधात आमरण उपोषण सुरु

Mhaswad, Satara I म्हसवड पालिका विरोधात आमरण उपोषण सुरु

म्हसवड : म्हसवड नगरपरिषदेने विकासकामाच्या नावाखाली सुरु केलेले रस्त्याचे काम हे बेकायदेशिर असुन सदरच्या रस्त्याचे काम हे खाजगी मालकिच्या जागेतुन सुरु असल्याचा आरोप येथील सुनिल भगवान शिंदे यांनी करीत याविरोधात पालिका विरोधात आमरण उपोषण सुरु केले आहे.

 

याबाबत शिंदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की म्हसवड नगरपरिषदेने येथील उद्यमनगर नं. १ येथे रस्त्याचे काम सुरु केले आहे, मात्र सदरचे काम हे सर्व्हे नं. ८१२ येथे सुरु असुन हा सर्व्हे नंबर हा आमच्या कुटुंबाच्या खाजगी मालकिचा आहे, याठिकाणी आमची वडीलोपार्जीत जमीन असुन पालिकेने या जमीनीतुनच रस्त्याचे काम सुरु केले आहे, वास्तवीक पालिकेने सदरच्या रस्त्याचे काम हे मंजुर असलेल्या डी. पी. प्रमाणे करण्यास आमची काहीही हरकत नाही, मात्र पालिका प्रशासन तसे न करता स्थानिक पुढाऱ्यांच्या सांगण्यावरुन जाणीवपुर्वक आमच्यावर अन्याय करीत आमच्या कुटुंबावर दबाव आणुन हे काम करीत आहे. सदर रस्त्याचे काम सुरु करताना पालिकेने आम्हाला याबाबत कोणतीही पुर्व सुचना न देता थेट काम सुरु केल्याने आम्ही हतबल झालो असुन प्रशासनच सामान्यांवर अन्याय करु लागल्यावर आम्ही दाद कोणाकडे मागायची असा सवाल करीत शिंदे यांनी थेट पालिका विरोधातच आमरण उपोषण सुरु केले आहे. दरम्यान शिंदे यांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे, शिवसेनेचे नेते बाळासाहेब मदने, युवा नेते जयसिंह राजेमाने, राजसिंह राजेमाने, आकाश माने, चेतन मुळीक, उत्तम व्हटकर यांनी भेट देत त्यांना आपला पाठींबा दर्शिवला.

 

हे पण वाचा  'वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यावी काळजी'

000

Tags:

Advertisement

Latest News

मावळ तालुक्यातील कुंडमळा दुर्घटनास्थळाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली पाहणी मावळ तालुक्यातील कुंडमळा दुर्घटनास्थळाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली पाहणी
वडगाव मावळ/ प्रतिनिधी  मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील साकव पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर ५१...
सिडने पॉईंटवरील पालिकेचा सोलर ट्री कोसळला
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोरेगावात आरोग्य विभागातर्फे हिवताप आणि डेंग्यूबाबत जनजागृती
कोरेगावातील शिरढोण मागासवर्गीयांच्या शौचालयावर डल्ला..
धोम वाई खून खटला जलद गतीने चालवावा न्यायालयाचे निर्देश
जावली तालुक्यातील अवैध दारूविक्रीच्या विरोधात लवकरच आंदोलनं
सात्विक सावंत याचे नीट युजी परीक्षेत उज्जवल यश

Advt