भाजपा कार्यकर्त्यांनी एकेक कार्यकर्ता जोडून पक्ष वाढवावा - नामदार आशिष शेलार
भाजपा पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत ना. आशिष शेलार यांचा कानमंत्र

सातारा : भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्रजी मोदी सरकारला केंद्रामध्ये सत्तेत येऊन ११ वर्षे पूर्ण झाली यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे "विकसित भारताचा अमृत काळ सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची ११ वर्षे" या विषयांतर्गत "संकल्प से सिद्धी" या अभियानांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे २१ जून योगा दिवस, २३ जून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिवस, २५ जून आणीबाणीचा काळा दिवस या प्रकारचे कार्यक्रम करण्यात येणार आहेत
वरील सर्व कार्यक्रमाच्या नियोजनासाठी भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले यांच्या सूचनेनुसार , भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची कार्यशाळा झाली, या कार्यशाळेला भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा झाली, महाराष्ट्र राज्याचे माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार आशिष शेलार यांची प्रमुख मार्गदर्शन या कार्यशाळेसाठी लाभले
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सर्व कार्यक्रम चांगल्या प्रकारे करावेत , नियोजन चांगले असावे सर्वांना बरोबर घेऊन काम करावे, जुन्या कार्यकर्त्याचा योग्य सन्मान राखावा, आणि अडचणीच्या काळातही संघटनेला कोणतीही बाधा येणार नाही असे मजबूत पक्ष संघटन करावे असं कानमंत्र ना आशिष शेलार यांनी पदाधिकाऱ्यांना दिला
यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रमजी पावसकर , आमदार मनोजदादा घोरपडे ,माजी आमदार दिलीपराव येळगावकर, माजी आमदार मदनदादा भोसले ,माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हा संयोजक सुनीलतात्या काटकर, कोरेगाव विधानसभा संयोजक प्रियाताई शिंदे, पाटण विधानसभा संयोजक विक्रमबाबा पाटणकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुवर्णाताई पाटील, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखाताई माने, स्वातीताई पिसाळ, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस कविताताई कचरे, सांस्कृतिक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष पंकज चव्हाण, भटके वीमुक्त आघाडी प्रदेश चिटणीस सदाशिव नाईक, जिल्हा सरचिटणीस , उपाध्यक्ष चिटणीस, जिल्हा पदाधिकारी, आघाड्या मोर्चा जिल्हा अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, संकल्प सिद्धी कार्यक्रमाचे मंडल संयोजक सहसंयोजक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
00000000000000000000
About The Author
Latest News
