हक्काचा न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा - सुगंधा कल्याणी
मुंबई / रमेश औताडे
कोणताही न्याय मिळवायचा असेल तर ठोस पुरावे असल्याशिवाय न्याय मिळत नाही. त्यासाठी मी सर्व पुरावे गोळा करून न्याय मागण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे मला आता नक्की न्याय मिळणार. असा विश्वास सुगंधा कल्याणी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
वडिलोपार्जित संपती व भाऊ व बहीण वाद जगजाहीर असतात. असाच एक वाद संपत्तीच्या कारणावरून सुरू आहे. सुगंधा कल्याणी आता सुगंधा हिरेमठ यांचे वडील डॉ.निळकंठ कल्याणी यांच्या संपत्तीचा भाऊ बहीण यांचा वाद आहे. सुगंध यांनी सर्व प्रकारची लढाई लढल्यानंतर न्यायालयाची पायरी चढली आहे. न्यायालय पण योग्य दिशेने जात असल्याचे सांगत त्यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. मात्र पुढील संपत्ती विभाजन सुनावणी होईपर्यंत भाऊ मालमत्ता विक्री होऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे.
या सर्व प्रकरणात गौरीशंकर यांच्या कार्यालयातील एक कर्मचारी प्रकाश होनराव म्हणाले, लवकरच सर्व मनमानी कारभार करणारे समोर येतील असे त्यांनी सांगितले. माझी नोकरी वाचावी म्हणून मी जे काही सहकार्य केले याचा उलगडा न्यायालयात पुढील सुनावणीत होईल.
000