- राज्य
- वडगाव नगरपंचायतीचा विकास आराखडा बिल्डर धार्जिणी? बिल्डरांच्या हितासाठी.सामान्य जनतेवर अन्याय; ग्रामस...
वडगाव नगरपंचायतीचा विकास आराखडा बिल्डर धार्जिणी? बिल्डरांच्या हितासाठी.सामान्य जनतेवर अन्याय; ग्रामस्थांचा आरोप
वडगाव शहराचा सुधारित विकास आराखड्याला तीव्र विरोध ;नगरपंचायतीवर ग्रामस्थांचा धडक मोर्चा
वडगाव मावळ/सतिश गाडे
वडगाव शहराचा सुधारित विकास आराखडा नगरपंचायत प्रशासनाने प्रसिद्ध केला आहे मात्र सदर विकास आराखडा हा सामान्य जनतेवर अन्याय कारक असून तो धनदांडण्यासाठी धार्जिना आहे असा आरोप वडगाव शहर भाजपने केला आहे. याबाबत वडगाव नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी तथा प्रशासन डॉ प्रविण निकम यांना निवेदन देण्यात आले आहे
यावेळी तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्यविश्वस्त किरण भिलारे,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, सचिव अनंता कुडे, शहराध्यक्ष संभाजी म्हाळसकर, सुभाषराव जाधव,अरुण चव्हाण सुधाकर पगडे, प्रभाकर वाघमारे आतिश ढोरे, किरण म्हाळसकर, भूषण मुथा,अनिल गुरव,मारुती चव्हाण, जयसिंग चव्हाण,मधुकर चव्हाण,रामचंद्र चव्हाण, जैन स्थानकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा राजेश बाफना , अशोकलाल गुजराणी, विनायक भेगडे, रमेश ढोरे, गणेश दंडेल, शेखर वहिले, झुंबरलाल कर्नावट ,अनिल बाफना , सुरेंद्र बाफना , डॉ.कुंदन बाफना, दिलीप मुथा, अमोल बाफना , अमित मुथा , रोहन मुथा , सौरभ दुगम , प्रशांत चव्हाण आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की वडगांव नगरपंचायत प्रशासनाने नुकताच दुसरा विकास आराखडा प्रसिध्द केला आहे.सदर वडगांव शहराचा विकास आराखडा हा सामान्य जनतेवर अन्याय कारक असून तो धनदांडण्यासाठी धार्जिना आहे.
वडगांव मावळ येथील पोटोबा महराज दत्त, महादेव, मारूती देवस्थानास शासनाने 'क' दर्जा प्राप्त झालेला आहे. सदर देवस्थान हे तालुक्याचे श्रध्दास्थान आहे. भविष्याचा विचार करिता धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमासाठी जागेची आवश्यकता भासणार आहे, तरी पोटोबा देवस्थान यांच्या जमिनीवर तीन - तीन ठिकाणी आरक्षण टाकून सदर जागा बाधित केलेली आहे. आजुबाजुचे धनदांडगे बांधकाम व्यावसायिक यांच्या जागा शाबुत ठेवून देवस्थानच्या जागा मात्र आरक्षण टाकून बाधित केलेल्या आहेत.
सदर विकास आराखड्यामध्ये जैन बांधवाचे श्रध्दास्थान असलेले आणि साधुसंतांचे निवासस्थान असलेले तळ्याजवळील जैन स्थानकावर जाणून बुजुन नव्याने आरक्षण दाखविण्यात आलेले आहे. तरी तमाम जैन बांधवांच्या धार्मिक भावनांचा आदर करून जैन स्थानकावरील आरक्षण तत्काळ हटविण्यात यावे ही मागणी देखील करण्यात आली.
वडगाव बाजारपेठेतील जुना पुणे मुंबई महामार्ग बाजारपेठेमध्ये पूर्व बाजूकडून वडगांव गावठाण हद्दीमध्ये पुढे वडगांव कोर्ट गेट नंबर १ पर्यंत १२ मीटर रूंदीचा असावा तसेच प्रभाग क्रमांक ९ मधील गावठाण हद्दीतील श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिर जवळील अंतर्गत रस्ता देखील ९ मीटर ऐवजी ६ मीटर करावा ही देखील आमची मागणी असल्याचे या निवेदनात नमूद केलेली आहे.
अनेक नागरिकांनी देखील यांचा आरक्षणाच्या बाबतीत असलेल्या तक्रारी या निमित्ताने नमूद केल्या तसेच नको असलेले आरक्षण तातडीने हटवावे यासाठी निवेदन देखील सादर केले.
वरिष्ठ अधिकारी यांना कळवून पुन्हा लेखी हरकती मागवुन आवश्यक बदल पुन्हा करू असे आश्वासन वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आणि प्रशासक डॉ.प्रवीण निकम यांनी दिले आहे
-मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम वडगाव-कातवी नगरपंचायत
About The Author
