- देश-विदेश
- पंतप्रधान मोदी यांचे आगमन ही आमच्यासाठी अभिमानाची बाब
पंतप्रधान मोदी यांचे आगमन ही आमच्यासाठी अभिमानाची बाब
त्रिनिनाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांची स्तुतिसुमने
नवी दिल्ली: प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन ही आमच्यासाठी केवळ औपचारिकता नाही तर अभिमानाची बाब आहे, असे उद्गार त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी काढले. पंतप्रधान मोदी यांना या देशाचा ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो हा सर्वोच्च नागरिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात सन्माननीय, दूरदृष्टी असलेले नेते आहेत. त्यांनी जागतिक मंचावर भारताचे स्थान उंचावले आहे, असेही बिसेसर यांनी नमूद केले. जगभरातील अब्जावधी भारतीयांना पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल अभिमान वाटतो. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत सशक्त आणि समर्थ राष्ट्र बनला आहे. प्रगतीची वाटचाल करीत आहे.
कोविडकाळातील मदतीबद्दल पंतप्रधान बिसेसर यांनी भारताचे आभार मानले. त्या संकटाच्या काळात आमच्यासारख्या छोट्या देशाची परिस्थिती फारच कठीण बनली होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी आम्हाला लस पाठवून मोलाची मदत केली. ही कृती केवळ राजनैतिक नव्हती. त्यामध्ये आमच्याबद्दलची आत्मीयता, बंधुभाव आणि मानवतेची भावना होती, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान बिसेसर या मूळच्या भारतीय असून बिहारमधील बक्सर जिल्ह्यात आहेत.