शिरसवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सायली शहाजी गोते(पवार) यांची बिनविरोध निवड!

माणिकराव गोते यांच्या नेतृत्वाखाली निवड

शिरसवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सायली शहाजी गोते(पवार) यांची बिनविरोध निवड!
वाघोली, विजय लोखंडे
 
शिरसवडी(ता.हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सायली शहाजी गोते उर्फ लग्नानंतरचे नाव सायली इंद्रजित पवार यांची बिनविरोध निवड बाजार समितीचे माजी सभापती तथा जिल्हा बँकेचे माजी संचालक ज्येष्ठ नेते माणिकराव गोते यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
                 
सीमा नामदेव गावडे यांनी शिरसवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी मंडलाधिकारी रुपाली सरतापे व ग्रामविकास अधिकारी स्वाती राजगुरू यांच्या अधिपत्याखाली निवडणूक पार पडली.यामध्ये सरपंच पदासाठी सायली गोते(पवार) व संगीता चितळकर हे दोन अर्ज दखल झाले होते.यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याने संगीता चितळकर यांचा अर्ज बाद झाल्याने  सायली गोते(पवार) यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची सरपंच पदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.याप्रसंगी माजी सरपंच सीमा गावडे,उपसरपंच अमित गोते,ग्रामपंचायत सदस्य तानाजी गावडे,माजी उपसरपंच तथा सदस्य मंगेश गावडे,माजी उपसरपंच तथा सदस्य किरण शिंदे,सदस्य कमल मुरकुटे,सदस्य सुप्रिया गोते उपस्थित होते.
                     
बिनविरोध निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित सरपंच गोते(पवार) यांचा सत्कार माजी सभापती ज्येष्ठ नेते माणिकराव गोते,बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक प्रकाश जगताप,यशवंत कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप,राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा माजी सरपंच संदिप गोते,यशवंत कारखान्याचे संचालक रमेश गोते,माजी सरपंच प्रफुल्ल शिवले,माजी सरपंच सीमा गावडे,पेठच्या सरपंच शोभा चौधरी,माजी सरपंच बाळासाहेब अवताडे,माजी सरपंच शहाजी गोते यांच्या हस्ते पार पडला.याप्रसंगी ज्येष्ठ नेते विकास कोतवाल,माणिकराव गावडे,बाळासाहेब गावडे,बाळासाहेब नागवडे,नामदेव गावडे,शिवाजी गोते,सुदाम मुरकुटे,कांताराम सातव,प्रशांत घुले,आदी मान्यवर,ग्रामस्थ उपस्थित होते.
 
000
Tags:

About The Author

Advertisement

Latest News

रायसोनी कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागालाएनबीए मान्यता! रायसोनी कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागालाएनबीए मान्यता!
पुणे: जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुण्यातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग (ई अँड टीसी) विभागाला राष्ट्रीय मान्यता...
शास्त्रीय संगीत-नृत्य, गायनाने सजला 'गंगाधर स्वरोत्सव युव-रंग'
३० जूनपर्यंत मालमत्ता कर भरून सवलतींचा लाभ घेण्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन
योगाच्या सामर्थ्याने जागतिक आरोग्य आणि शांततेच्या दिशेने भारताचे नेतृत्व : केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव
रसिकांनी अनुभवले परिपक्व ध्रुपदगायन आणि रंगतदार ख्यालगायन
देशाच्या आर्थिक प्रगतीत सनदी लेखापालांचे महत्व अनन्यसाधारण: गायकवाड
४५ प्रवासी तासगावला सुखरूप परतले!

Advt