पुणे - डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे जागतीक पर्यावरण दिनानिमित्त मुख्यालयातील गार्डन मध्ये मा महासंचालक सुनील वारे यांच्या हस्ते बुद्ध गया येथुन आणलेल्या बोधीवॄक्षाचे रोपण करण्यात आले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मा महासंचालक वारे यांनी शुभेच्छा देतांना आपण पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे तसेच प्रत्येकांनी एक झाड लावुन त्यांचे संगोपन व जोपासले पाहिजे अशा आशावाद व्यक्त केला.
यावेळी विभागप्रमुख अनिल कारंडे, शुभांगी पाटिल, कार्यालय अधीक्षक डॉ संध्या नारखेडे, सचिन जगदाळे, प्रकल्प व्यवस्थापक नसरिन तांबोळी, सुमेध थोरात, डॉ सारिका थोरात, शुभांगी सुतार, आरती जाधव, रामदास लोखंडे अमोल राऊत (माळी ) यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
000
About The Author
Latest News
06 Jun 2025 22:33:04
पुणे : प्रतिनिधी
भारत - पाकिस्तान संघर्षादरम्यान भारताने पाकिस्तानला धडा शिकवायची संधी का दवडली? पाकिस्तानवर वर्चस्व मिळवण्याची संधी का सोडली,...