'वाल्मिक कराडला पाठीशी घालण्याचे प्रयत्न'

तुरुंगात व्हीआयपी वागणूक मिळत असल्याचा दमानिया यांचा आरोप

'वाल्मिक कराडला पाठीशी घालण्याचे प्रयत्न'

मुंबई: प्रतिनिधी 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यप्रकरणी वाल्मिक कराड याला पाठीशी घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातून (मोक्का) वगळण्यासाठी हालचाली होत आहेत. त्याला कारागृहात व्हीआयपी वागणूक मिळत आहे, असे आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहेत. 

वाल्मिक कराड करणार भाजपमध्ये प्रवेश 

खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश २८ डिसेंबर रोजी दिले होते. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवून कराड याच्या मालमत्ता जप्त करण्याचे टाळले. जात असल्याचे दमानिया यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्याला मोक्कामधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून कराड लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करेल, अशी शक्यता दमानिया यांनी व्यक्त केली आहे. 

हे पण वाचा  'जारण'च्या प्रमोशनल साँगने उडवला प्रेक्षकांचा थरकाप

जालंधर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांच्यावर आरोप 

वरिष्ठ पोलीस अधिकारी जालंधर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांनी बंदूक परवाना प्रकरणात मोठ्या प्रमाणात पैसे खाल्ले असल्याचा आरोप करून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याबाबत चौकशीचे आदेश दिल्याचा दावाही दमानिया यांनी केला. कराड याला बीड कारागृहात ठेवण्यामागेही सुपेकर यांचा हात असल्याचा दावाही त्यांनी केला. 

देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरारीच आहे. पोलिसांनी अद्याप त्याचे मोबाईल फोन जप्त केले नाहीत, याकडेही दमानिया यांनी लक्ष वेधले.

About The Author

Advertisement

Latest News

'दहशतवादविरोधी लढ्यात भारताकडून जगाला खूप अपेक्षा' 'दहशतवादविरोधी लढ्यात भारताकडून जगाला खूप अपेक्षा'
मुंबई: प्रतिनिधी  दहशतवादाचे मोठे संकट जगासमोर असून त्याच्या विरोधातील लढ्यात जगाला भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत, असे 'ऑपरेशन सिंदूर' राबविण्यामागील भारताची...
सस्पेन्स थ्रीलर 'शातिर - द बिगिनिंग' 13 जूनला होणार प्रदर्शित
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण मोहीम
भारताशी वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तान उतावीळ
'राज ठाकरेंची इच्छा ती माझी इच्छा, पुढाकार कोणीही घ्यावा'
शशांक हगवणे याची भामटेगिरी उघड
कॅल्शियमची कमतरता पूर्ण करणारा आयुर्वेदिक सिध्द कॅल्सी योग !

Advt