मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला सुरुवात
"रुग्णांची सेवा करणे हेच खरे भाग्य" - आमदार मनोज घोरपडे
कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्याअंतर्गत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास उत्साहात सुरुवात झाली. संपूर्ण मतदारसंघातील अनेक ठिकाणी शिबिरे घेऊन रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. तपासणीत ज्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासली, अशा रुग्णांना पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्यात येत आहे.
या उपक्रमाअंतर्गत वाठार किरोली येथून सुमारे ६० रुग्णांना घेऊन एक बस पुणे येथील एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलकडे रवाना करण्यात आली. या वेळी शिबिराचे उद्घाटन करताना खटाव माण साखर कारखान्याचे संचालक कृष्णात शेडगे यांनी नारळ फोडून शुभेच्छा दिल्या. हॉस्पिटलचे डॉक्टरही यावेळी उपस्थित होते.
गेल्या दहा वर्षांपासून मनोज घोरपडे युवा मंचच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरू आहे. या कालावधीत आतापर्यंत सुमारे २० हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. “रुग्णांची सेवा करणे हेच खरे भाग्य असून हे कार्य भविष्यातही अखंडपणे सुरू राहील,” असे आमदार मनोज घोरपडे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला विकास गायकवाड, सोमनाथ भोसले, सुनिता कांबळे, सुरेश गायकवाड, गणेश गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, निलेश गायकवाड, बाळू पाटील, अण्णा चव्हाण, विनायक जंगम, सचिन काटे, दुष्यंत शिंदे, निलेश शेडगे, जितेंद्र फाळके, अमोल घाडगे, सुनील चव्हाण, महादेव खिलारे, नवनाथ भोसले, भगवान ठोंबरे, सुभाष गायकवाड, वैजनाथ जंगम, सुरज घोरपडे, शुभम खिलारे, यश शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
0000000000000