विरकरवाडी येथे नवीन शैक्षणिक वर्ष "शाळा प्रवेशोत्सव २०२५" उत्साहात

विरकरवाडी येथे नवीन शैक्षणिक वर्ष

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी विद्यार्थ्यांचं केलं अनोखं स्वागत

 

वडूज : शालेय जीवनाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या मनात आनंद साठवणारा आणि प्रेरणादायी ठरणारा असा "शाळा प्रवेशोत्सव २०२५" आज राज्यभरात साजरा करण्यात आला. याच अनुषंगाने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी वीरकरवाडी ता. माण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देत विद्यार्थ्यांची ट्रॅक्टर मधून मिरवणूक काढली व विद्यार्थ्यांचे खास स्वागत करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

राज्यातील नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी ना.जयकुमार गोरे यांनी विविध शाळांना भेटी देत मुलांचा पहिला दिवस खास करण्यासाठी सहभाग घेतला. ना.जया भाऊंचं यावेळी पारंपारिक लेझीम व गजीनृत्याने स्वागत करण्यात आलं.या कार्यक्रमात शाळेच्या परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फुलांची सजावट व गजिनृत्य, शाळा परिसरात "ऐक पेड माँ के नाम" या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आलं.

हे पण वाचा  तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत परप्रांतीय वाढले

याप्रसंगी ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते आदर्श शाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर इयत्ता पहिली मध्ये नवीन प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक शासकीय योजना राबवल्या जातात, त्यामध्ये पोषण आहार योजना मोफत पाठ्यपुस्तक योजना या सर्व योजना गोरगरिब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि त्यांचा गुणात्मक विकास करा.राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण, पाठ्यपुस्तकं, गणवेश, आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध आहे. भविष्यातील सक्षम पिढी घडवण्यासाठी शासन शिक्षणावर भरघोस खर्च करीत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व पातळीवर दक्षता घेतली जात आहे असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. शाळेच्या पहिल्या दिवशीचा आनंद, नवीन वर्ग, नवीन पुस्तकं आणि स्वागताच्या गोड आठवणी यांनी मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.

या कार्यक्रमास माण तालुकाअध्यक्ष प्रशांत गोरड , युवानेते लुनेश विरकर, लाडकी बहीण योजनेचे माण विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे ,अल्पसंख्यांक आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष अकील काझी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे,माण गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे,सहायक गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे,माण गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे,केंद्रप्रमुख पतंगे,शालेय स्थापन समितीचे अध्यक्ष विशाल विरकर, सर्व सदस्य, मुख्याध्यापक तोरणे मॅडम,किरण बोराटे तसेच पालक,ग्रामस्थ उपस्थित होते. 

00000000000000000000

Tags:

Advertisement

Latest News

 प्रेमसंबंधातून प्रेयसीने डोक्यात बॅट घालून प्रियकराचा केला खून;मावळातील इंदोरी येथील घटना प्रेमसंबंधातून प्रेयसीने डोक्यात बॅट घालून प्रियकराचा केला खून;मावळातील इंदोरी येथील घटना
वडगाव मावळ/प्रतिनिधी  प्रेम संबंध ठेवण्याच्या कारणावरून दारूच्या नशेत घरात आलेल्या प्रियकराचे लाकडी बॅटने बेदम मारहाण करून खुन केल्याची धक्कादायक घटना...
विरकरवाडी येथे नवीन शैक्षणिक वर्ष "शाळा प्रवेशोत्सव २०२५" उत्साहात
सातारा जिल्ह्यातील दिंडीच्या सन्मानासाठी मठाधिपती विठ्ठल स्वामीं आक्रमक
आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सिईओ यांचे स्वागताने भारवले विद्यार्थी ..!
गुलाब पुष्प आणि रेवडी देऊन महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत
नैसर्गिक ओढे नाले बुजवल्यामुळे केसनंद मध्ये घराघरात पाणी घुसले....
डी डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लिमिटेडतर्फे श्रुती अगरवाल यांची पूर्णवेळ संचालकपदावर पदोन्नती

Advt