मोराळे येरळा नदीवरील तात्पुरता रस्ता म्हणजे आळवा वरील पाणी

मोराळे येरळा नदीवरील तात्पुरता रस्ता म्हणजे आळवा वरील पाणी

मायणी : गेले अनेक वर्षापासूनची मागणी असलेला मोराळे मायणी रस्त्यावर मोराळे येथील येरळा नदीवरील पुलाचे काम आत्यंत धिम्या गतीने सुरू असून त्यातच पावसाने हजेरी लावल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली परंतु मायणी निमसोड ह्या मार्गावर कायम रहदारी आसते ,आणि येथील लोकांची मागणी लक्षात घेता यावर उपाय म्हणून तात्पुरता पूल तयार केला होता परंतु हा तात्पुरता पूल म्हणजे आळवा वरील पाणी असल्याचे सिद्ध झाले आहे कारण सध्या पावसाचा जोर सगळीकडे असल्यामुळे वारंवार नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढत असून आता सुरू असलेला रस्ता हा पाण्याखाली गेल्याने पुन्हा एकदा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती निमसोड येथील ग्रामपंचायत ने दिली आहे त्यामुळे या रस्त्यावरील मुख्य फुलाचे बांधकाम झाल्याशिवाय कायमस्वरूपी हा प्रश्न मिटणार नाही त्यातील अजून पावसाचे तीन ते चार महिने पावसाळा असून या काळात वाहतुकीसाठी हा रस्ता कायमस्वरूपी सुरू ठेवायचा असेल तर यावर तात्पुरत्याच स्वरूपाचा पण टिकणारा साखव तयार करणे गरजेचे आहे नाहीतर तीन ते चार महिन्यासाठी मायणी ते निमसोड जाणारा रस्ता कायमस्वरूपी बंद होऊ शकतो मायणी येथून सातारला जाण्यासाठी हा मार्ग जवळचा असल्यामुळे या मार्गावर कायमच वाहतूक वर्दळीचे असते संबंधित ठेकेदाराने याकडे लक्ष देऊन सदरचा साकव तात्पुरत्या स्वरूपाचा का होईना परंतु भक्कम अशा स्थितीत आणि थोडासा उंच करावा म्हणजे येणाऱ्या काळात लोकांना ये जा करण्यास अडचण राहणार नाही.

0000000000000000000000000

Tags:

Advertisement

Latest News

Advt