आजी-माजी सैनिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही

आजी-माजी सैनिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही

कराडमध्ये प्रशासनाच्या उपस्थितीत मेळावा; सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कराड : कराड तहसील कार्यालयात मंगळवारी आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे व तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सैनिकांच्या समस्या, तक्रारी व अर्जांवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली.

सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी आणि अमृत वीर जवान अभियानाचे शासकीय सदस्य प्रशांत कदम यांनी या मेळाव्याची मागणी केली होती. या उपक्रमासाठी गटविकास अधिकारी प्रताप पाटील, उपविभागीय भूमी अभिलेख अधिकारी प्रवीण पवार, नायब तहसीलदार बाबुराव राठोड, तहसील कार्यालयातील राजेंद्र चव्हाण, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय साताऱ्याचे गोरखनाथ जाधव, दिलीप पाटील, तसेच पोलिस व कृषी विभागासह इतर सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आजी-माजी सैनिक, तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी विविध प्रश्न मांडले. त्या प्रश्नांचे निराकरण प्रशासनाच्या वतीने तत्काळ करण्यात आले. विशेष म्हणजे, ही बैठक सुसंगत, सकारात्मक व सविस्तर चर्चा करत पार पडली.

हे पण वाचा  मुसांडवाडी फाटा ते म्हासुर्णे रस्ता गेलाय पूर्ण पणे खड्ड्यात

याप्रसंगी सैनिक संघटना कराड तालुक्याचे अध्यक्ष सदाशिव नागणे, उपाध्यक्ष सचिन माने, विजय पाटील, तसेच चिखली येथील सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष भीमराव सावंत यांच्याहस्ते उपस्थित अधिकारी व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन (नि.) सुभेदार राजाराम माळी, सदाशिव नागणे यांनी आभार मानले. या मेळाव्यास मोठ्या संख्येने सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

0000000

Tags:

Advertisement

Latest News

यशवंत विचार संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवणार यशवंत विचार संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवणार
रणजीतसिंह देशमुख यांनी स्वीकारला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती सातारा : सातारा जिल्ह्याने लोककल्याणकारी सुसंस्कृत...
पुणे ते सातारा रस्त्यांच्या विकसनाचा पुन्हा डीपीआर बनणार
शिवसेना महिला आघाडीच्या खटाव तालुका प्रमुखपदी मुमताज मुलाणी
मावळातील शाळेची जिल्हास्तरीय यशस्वी कामगिरी – पिंपळखुटे शाळेला तृतीय क्रमांकाचा सन्मान
मुसांडवाडी फाटा ते म्हासुर्णे रस्ता गेलाय पूर्ण पणे खड्ड्यात
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे भारत चौथ्या क्रमांकाची महासत्ता
अहमदाबाद विमान दुर्घटनेत कराडची कन्या गमावली

Advt