शिवसेना महिला आघाडीच्या खटाव तालुका प्रमुखपदी मुमताज मुलाणी

शिवसेना महिला आघाडीच्या खटाव तालुका प्रमुखपदी मुमताज मुलाणी

वडूज : मागील अनेक वर्षें सामाजिक कार्य करणाऱ्या खटाव तालुक्यातील ललगूण येथील सामाजिक कार्यकर्त्यां मुमताज मुलाणी यांची शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या महिला आघाडी खटाव तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

सातारा येथील एका कार्यक्रमात महिला आघाडी जिल्हा संघटिका शारदाताई जाधव, जिल्हा उप संघटिका संगीता पवार आदी पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत मुमताज मुलाणी यांना पालक मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देवून अभिनंदन करण्यात आलं.

"दरम्यान मला मिळालेलं महिला आघाडी तालुका प्रमुखपद हे सन्मानानं मी स्वीकारत असून राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब, पालक मंत्री ना. शंभूराज देसाई साहेब, आमदार महेश शिंदे, जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढीसाठी तसेच मजबूत पक्ष संघटन उभं करण्यासाठी जबाबदारीनं काम करणार असल्याचं नूतन महिला अध्यक्षा मुमताज मुलाणी यावेळी म्हणाल्या.तर पक्ष संघठनासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना लागेल तेवढी ताकद दिली जाईल, असं ठाम आश्वासन पालक मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. यावेळी जिल्हा तसेच विविध तालुक्यातील शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

000000000000000000

हे पण वाचा  शिक्षण मंडळ, कराडचे विद्यार्थी पहिलीपासूनच गिरवणार संस्कृतचे धडे

Tags:

Advertisement

Latest News

मावळ तालुक्यात भीषण दुर्घटना कुंडमळा पूल कोसळला;२५ ते ३० पर्यटक बुडाल्याची भीती मावळ तालुक्यात भीषण दुर्घटना कुंडमळा पूल कोसळला;२५ ते ३० पर्यटक बुडाल्याची भीती
    वडगाव मावळ/ प्रतिनिधी मावळ तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून भीषण दुर्घटना घडल्याची
शिक्षण मंडळ, कराडचे विद्यार्थी पहिलीपासूनच गिरवणार संस्कृतचे धडे
यशवंत विचार संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवणार
पुणे ते सातारा रस्त्यांच्या विकसनाचा पुन्हा डीपीआर बनणार
शिवसेना महिला आघाडीच्या खटाव तालुका प्रमुखपदी मुमताज मुलाणी
मावळातील शाळेची जिल्हास्तरीय यशस्वी कामगिरी – पिंपळखुटे शाळेला तृतीय क्रमांकाचा सन्मान
मुसांडवाडी फाटा ते म्हासुर्णे रस्ता गेलाय पूर्ण पणे खड्ड्यात

Advt