"कारखाना" कादंबरी पुढील पिढीसाठी माहितीपूर्ण - रामकृष्ण वेताळ

अभयकुमार देशमुख लिखित कादंबरी ग्रंथालयांना भेट

 

कराड : वाचनालये आणि लेखकांना उभं करण्यासाठी समाजातील राजकीय, सामाजिक घटकांनी मदत करणे गरजेचे आहे. अभयकुमार देशमुख यांची कारखाना कादंबरी ही सहकार क्षेत्रातील माहिती येणार्‍या कित्येक पिढ्यांना देत राहील, असा विश्वास भाजपा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केला.

विद्यानगर (कराड) येथील समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयात लेखक अभयकुमार देशमुख लिखित "कारखाना" ही कादंबरी कराड तालुक्यातील वाचनालयांना भेट देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार होते. यावेळी मुख्याध्यापक दीपक पवार, वाचनालयाच्या अध्यक्षा कांचन धर्मे, उपाध्यक्ष प्रा. दादाराम साळुंखे, सूर्यमाला जाधव, विशाल पाटील उपस्थित होते.

हे पण वाचा  जाहिरात शिखर संस्‍था ‘फेम’च्या अध्यक्षपदी नाशिकचे रवी पवार , संचालकपदी सातारचे राहुल देशपांडे यांची बिनविरोध निवड

श्री. वेताळ म्हणाले, समाज बुद्धीने सशक्त होण्यासाठी वाचनसंस्कृती भक्कम करणे गरजेचे आहे. वाचन संस्कृती होण्यासाठी नवनवीन लेखक निर्माण व्हावेत. त्यांनी लिखाण केले तर, वाचनालये उभारली जातील, त्यातून उद्याची भावी पिढी निर्माण होऊन समाज भक्कम होईल.

पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार म्हणाले, लेखकाच्या लिखाणातून समाज घडत असतो. आज-काल तरुण, तरुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टींचे आकलन लवकर करतात. त्यामुळे पुढील पिढी घडण्यासाठी लेखकांनी समाज प्रबोधनपर लिहिणे आणि ते वाचलं जाणं गरजेचं आहे.

कार्यक्रमास तालुक्यातील वाचनालयांचे ग्रंथपाल व वाचक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. दादाराव साळुंखे यांनी केले. मुख्याध्यापक दीपक पवार यांनी आभार मानले.

चौकट :

रामकृष्ण वेताळ यांचे दातृत्व

लेखक अभयकुमार देशमुख यांची "कारखाना" कादंबरी कराड तालुक्यातील वाचकांना उपलब्ध व्हावी. तसेच ग्रंथालयांतील ग्रंथ साहित्यात वाढ व्हावी, यासाठी भाजपा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांनी स्वखर्चाने या कादंबर्‍या ग्रंथालयांना भेट दिल्या.

Tags:

Advertisement

Latest News

मावळ तालुक्यातील कुंडमळा दुर्घटनास्थळाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली पाहणी मावळ तालुक्यातील कुंडमळा दुर्घटनास्थळाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली पाहणी
वडगाव मावळ/ प्रतिनिधी  मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील साकव पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर ५१...
सिडने पॉईंटवरील पालिकेचा सोलर ट्री कोसळला
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोरेगावात आरोग्य विभागातर्फे हिवताप आणि डेंग्यूबाबत जनजागृती
कोरेगावातील शिरढोण मागासवर्गीयांच्या शौचालयावर डल्ला..
धोम वाई खून खटला जलद गतीने चालवावा न्यायालयाचे निर्देश
जावली तालुक्यातील अवैध दारूविक्रीच्या विरोधात लवकरच आंदोलनं
सात्विक सावंत याचे नीट युजी परीक्षेत उज्जवल यश

Advt