शेनवडी येथे नवीन तलाठी कार्यालय इमारत बांधकाम भूमिपूजन सोहळा संपन्न

शेनवडी येथे नवीन तलाठी कार्यालय इमारत बांधकाम भूमिपूजन सोहळा संपन्न

वडूज :  महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे-पाटील व राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे  यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा माजी जिल्हाध्यक्ष, वर्धन ऍग्रो कारखान्याचे चेअरमन धैर्यशीलदादा कदम यांच्या सहकार्यातून पुसेसावळी जि.प. गटाचे युवा नेते, वर्धन ऍग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर झालेल्या शेनवडी ता खटाव येथे नविन तलाठी कार्यालयाचा इमारत बांधकाम भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

 

हे पण वाचा  कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे मेथीचे बाजारभाव कडाडले. मेथी जुडी ६० रुपये दराने खरेदी!

पुसेसावळी जिल्हा परिषद गटामध्ये  विक्रमबाबांच्या माध्यमातून दहा गावांमध्ये नवीन तलाठी कार्यालये मंजूर झाली आहेत. यावेळी जेष्ठ नेते, हरणाई पतसंस्थेचे चेअरमन भीमराव घोडके, एल.एम. महाडिक, सरपंच रवि घोडके, जेष्ठ नेते चंद्रकांत महाडिक, माजी उपसरपंच बबन माळी, चेअरमन बबन घोडके, व्हाइस चेअरमन मारुती घोडके, तंटामुक्ती अध्यक्ष सुखदेव घोडके, माजी सरपंच  ज्ञानेश्वर पाटील,रवी भोसले, जयराम घोडके, कुंडलिक घोडके, रवींद्र घोडके,चंद्रकांत रसाळ, वैभव रसाळ, यशवंत घोडके, संदीप घोडके,सागर जाधव, मोहन रसाळ, संताजी घोडके यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

 

000

Tags:

Advertisement

Latest News

Advt