निवडणूक पार पडण्यापूर्वीच पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
एक सदस्यीय व मतपत्रिकेची सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी
पुणे: प्रतिनिधी
बहु सदस्य प्रभाग पद्धतीने होणारी निवडणूक बेकायदेशीर असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एक सदस्य प्रभाग पद्धतीने व मतदान यंत्र न वापरता मतपत्रिकेवर घेतल्या जाव्यात, अशी मागणी ज्यष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. समाज माध्यमाद्वारे कुंभार यांनी या निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
ते म्हणतात,
स्थानिक स्वराज्य निवडणुका – पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह!
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पण या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट (VVPAT) वापरणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
हा निर्णय अत्यंत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त आहे!
एकीकडे ईव्हीएमच्या (EVM) वापराबाबत शंका घेतल्या जात आहेत, तर दुसरीकडे बहु सदस्य प्रभागांबाबतही वाद सुरु आहेत. अशा परिस्थितीत व्हीव्हीपॅट न वापरणे म्हणजे पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उभं करण्यासारखं आहे.
📌 आयोग सांगतो – “व्हीव्हीपॅटसह ईव्हीएम एक सदस्य प्रभागांसाठीच आहे, त्यामुळे बहु सदस्य प्रभागात वापरता येत नाही.”
पण खरा मुद्दा वेगळाच आहे — बहु सदस्य प्रभाग हेच मुळात बेकायदेशीर आणि चुकीचे आहेत!
🧾 1961 पूर्वी लोकसभा आणि विधानसभा मतदार संघाच्या निवडणुका बहु सदस्यीय पद्धतीने व्हायच्या .१९६१ सालीच द्वि सदस्य पद्धत कायदा करून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतून रद्द करण्यात आली होती. त्यावेळी जी कारणं देण्यात आली होती, तीच स्थानिक स्वराज्य संस्थांनाही लागू होतात.
मग असा भेदभाव का?
जे निकष लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी लावले जातात, तेच स्थानिक स्वराज्य संस्थांनाही लागू व्हायला हवेत.
✅ जर या निवडणुका पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने व्हाव्या वाटत असेल आणि निवडणूक आयोग पूर्णपणे पारदर्शक पद्धत वापरण्यात अपयशी ठरत असेल, तर ह्या निवडणुका
👉 एक सदस्य प्रभाग पद्धतीने
👉 आणि बॅलेट पेपरवरच घ्यायला हव्यात !
ही फक्त निवडणूक नाही, तर लोकशाहीवरचा विश्वास आहे — तो डळमळू देता कामा नये !