गणेशोत्सवादरम्यान लेझर लाईटच्या वापरावर बंदी

उत्सव काळात व मिरवणुकीत डीजेवर बंदी घालण्याची आग्रही मागणी

गणेशोत्सवादरम्यान लेझर लाईटच्या वापरावर बंदी

कोल्हापूर: प्रतिनिधी

लेझर लाईटमुळे डोळ्यांवर, विशेषतः बुबुळांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे गणेशोत्सवादरम्यान लेझर लाईटचा वापर करण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. या आदेशानुसार दिनांक 26 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत लेझर लाईटचा वापर करता येणार नाही. 

मागील वर्षी गणेश विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी आलेल्या नागरिकांपैकी काही जणांच्या डोळ्यावर लेझर लाईट पडल्यामुळे त्यांच्या डोळ्यांच्या पडद्याला व बुबुळांना इजा झाल्याचे प्रकार उघडकीला आले होते. यावर्षी असे प्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 ( 1) नुसार लेझर लाईट वापराला बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

डीजेवर बंदी घाला 

हे पण वाचा  लाडक्या बहिणींची घरोघरी जाऊन होणार पडताळणी

सातारा शहरातही गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीच्या काळात डीजेच्या वापरावर बंदी घालण्याची आग्रही मागणी करण्यात येत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. सातारा शहर पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखले जाते. मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक या शहरात राहतात. डीजेच्या दणदणाटाने हृदयविकाराचे रुग्ण, वयस्कर व्यक्ती, लहान मुले, गर्भवती महिला यांना धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे गणेशोत्सवात डीजेचा वापर करण्यास बंदी घातली जावी, अशी मागणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे. 

 

About The Author

Advertisement

Latest News

मावळातील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर: वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर मावळातील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर: वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर
वडगाव मावळ/ प्रतिनिधी मावळ तालुक्यातील वडगाव-कान्हे आणि लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयांच्या आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी आज महाराष्ट्र...
'परिस्थितीशी झगडून मोठे होण्याचे स्वप्न पहा'
'स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मतपत्रिकेवर घ्या'
'देशाला सक्षम पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची आवश्यकता'
'तुम्ही केली तर शाई फेक आणि आम्ही केला तर हल्ला का?'
लाडक्या बहिणींची घरोघरी जाऊन होणार पडताळणी
'राजकीय स्वार्थासाठी भावनांचा गैरवापर नको'

Advt