- राज्य
- कबूतरखान्यच्या प्रश्नावरही मुख्यमंत्र्यांनी काढला तोडगा
कबूतरखान्यच्या प्रश्नावरही मुख्यमंत्र्यांनी काढला तोडगा
अचानक कबूतरखाने बंद करणे योग्य नसल्याची सरकारचीर भूमिका
मुंबई: प्रतिनिधी
अचानक कबूतरखाने बंद करणे योग्य नसल्याची सरकारची भूमिका असून ताडपत्री टाकून झाकलेले कबुतरखाने उघडण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे कबुतरे, प्राणिप्रेमी नागरिक आणि जैन समाजाला दिलासा मिळाला आहे.
वनतारा प्राणी केंद्रा रवना करण्यात आलेली महादेवी हत्तीण आणि कबुतरखान्यांवर बंदी या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, हसन मुश्रीफ, प्रकाश अबिटकर उपस्थित होते.
कबुतरांमुळे मानवी आरोग्यावर हानिकारक परिणाम होत असल्याचे सांगितले जात असले तरी त्यावर अधिक अभ्यास होणे आवश्यक आहे. कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारी अस्वच्छता टाटाने विकसित केलेल्या आधुनिक यंत्रणेद्वारे दूर केली जाऊ शकते, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कबुतरांना उघड्यावर खायला घातल्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नावरून मार्ग काढण्यासाठी बंदिस्त स्वरूपाची व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे. ती जोपर्यंत उभी राहत नाही तोपर्यंत नियंत्रित खाद्य पुरवठ्याचा मार्ग अवलंबावा, अशी सूचना फडणवीस यांनी महापालिकेला केली आहे.
कबुतरखान्यांबत उच्च न्यायालfयात सुरू असलेल्या कामकाजात बृहन्मुंबई महापालिकेने ठामपणे वाढू मांडावी. राज्य सरकार देखील याबाबत आपली भूमिका स्पष्ट करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.