जात पडताळणी समित्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात

जात पडताळणी समित्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात

मुंबई / रमेश औताडे

जात वैधता मिळत नसल्यामुळे अनेक मागासवगीॅय विद्यार्थी व्यवसायिक शिक्षण घेऊ शकत नाहीत. फक्त पदवीधर होवुन काही फायदा नाही. कारण शासनाकडे त्या प्रकारच्या नोकऱ्या नाहीत. व्यवसायिक शिक्षण घेतले तर स्वःत काहीतरी उद्योग करु शकतील. पण त्याचे नियोजन करताना जात पडताळणी समित्या मनमानी कारभार करत न्यायालयाला गृहीत धरत आहेत. त्यामुळे जात पडताळणी समित्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवेधता देवु नका असा आदेशच मंत्रालयातून आला आहे की काय ? असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. जिल्हा समित्या स्थापन करा असा आदेश असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तर काही ठिकाणी असे मनमानी करणारे आधिकारी बसले आहेत. हेच अधिकारी खरे आरक्षण संपावायला जबाबदार आहेत. आरक्षण मिळत नसेल शासन वैधता देत नसेल तर आरक्षण बंद करा असेही काही विद्यार्थी बोलत आहेत.

प्रत्येक जिल्हात जात पडताणी समित्या स्थापन झाल्या पाहिजेत, 
समित्यानी वेळेवर कोणाताही दुजाभाव न करता वैधता किती पाहिजे, जात पडताणी समित्यांच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थ्यांना न्यायालयात धाव घ्यावी लागणार नाही व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, जात पडताणी समित्यामधे सेवानिवृत कर्मचाऱ्यांना पुन्हा पदस्थापना देताना नविन तरुणांना नोकरीची संधी दयावी, विशिष्ट जातीच्या लोकाना वैधता देताना त्रास न देता इतरांसारखे नियम लावावेत. या मागण्या विद्यार्थांनी केल्या आहेत.

हे पण वाचा  आधुनिक व्हा पण संस्कार सोडू नका: मीनाक्षी सेहरावत

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

मावळातील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर: वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर मावळातील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर: वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर
वडगाव मावळ/ प्रतिनिधी मावळ तालुक्यातील वडगाव-कान्हे आणि लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयांच्या आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी आज महाराष्ट्र...
'परिस्थितीशी झगडून मोठे होण्याचे स्वप्न पहा'
'स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मतपत्रिकेवर घ्या'
'देशाला सक्षम पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची आवश्यकता'
'तुम्ही केली तर शाई फेक आणि आम्ही केला तर हल्ला का?'
लाडक्या बहिणींची घरोघरी जाऊन होणार पडताळणी
'राजकीय स्वार्थासाठी भावनांचा गैरवापर नको'

Advt