'ठाकरे ब्रँड कोमात; देवाभाऊ जोमात'

बेस्ट पतपेढी निकालानंतर ठाकरे आणि भाजपमध्ये रंगणार वाग्युद्ध

'ठाकरे ब्रँड कोमात; देवाभाऊ जोमात'

मुंबई: प्रतिनिधी

बेस्ट कामगार सहकारी पतसंस्था निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीचा सपशेल पाडाव झाल्यानंतर भाजपने शहरभर, विशेषतः खुद्द शिवसेना भवनासमोर उद्धव ठाकरे यांना डिवचणारे फलक लावले आहेत. त्यामुळे आता ठाकरे बंधू आणि भाजप यांच्यात वाग्युद्ध भडकण्याची चिन्ह आहेत. 

या फलकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पतपेढी निवडणुकीचे नेतृत्व करणारे आमदार प्रसाद लाड, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार यांची छायाचित्र आहेत. शिवाय उद्धव ठाकरे यांचे डोक्याला हात लावलेले छायाचित्र आहे. या फलकावर 'ठाकरे ब्रँड कोमात, देवाभाऊ जोमात,' असा उल्लेखही करण्यात आला आहे. 

वास्तविक अत्यंत मर्यादित स्वरूप असलेल्या या निवडणुकीत ठाकरे बंधू प्रथमच एकत्र येऊन उतरल्याने प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. मात्र, 21 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनल चा एकही उमेदवार निवडून आला नाही. सर्वाधिक 14 जागा मिळवणाऱ्या संघटनेचे नेते शशांक राव हे स्वतः भाजपचे नेते आहेत. इतर सात जागांवर लाड यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने पुरस्कृत केलेले उमेदवार निवडून आले आहेत. 

हे पण वाचा  नांदेड जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

लवकरच होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील या निवडणुकीचे महत्त्व वाढले होते. मागील नऊ वर्षापासून ही पतपेढी शिवसेनेच्या ताब्यात होती. बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये प्रामुख्याने मराठी कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत या कर्मचाऱ्यांचा पाठिंबा प्रामुख्याने शिवसेनेला राहिला आहे. त्यामुळे मर्यादित अर्थाने का होईना, आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईकर मराठी जनमत कोणत्या बाजूने असेल, याची चाचपणी होऊ शकते. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt