तीन मजुरांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल

कष्टकरी कामगार पंचायतचा पाठपुरावा सफल

तीन मजुरांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल

पिंपरी: प्रतिनिधी

निगडी प्राधिकरण परिसरात बीएसएनएलच्या फायबर ऑप्टिकल्स केबल टाकण्याच्या कामादरम्यान झालेल्या गंभीर गुन्हेगारी निष्काळजीपणामुळे तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या प्रकरणात, कष्टकरी कामगार पंचायतच्या अथक पाठपुरवठ्यामुळे अखेर न्यायालयीन कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणी निगडी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड साहिता मधील संबंधित कायद्यांतर्गत प्राथमिक माहिती अहवाल (FIR) दाखल करण्यात आला असून, दोषींविरुद्ध कठोर दंडनीय कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे.

कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष आणि कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी या प्रकरणात सातत्याने पाठपुरावा करून न्याय मागितला. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच हे अत्यंत दुर्दैवी घटना घडली, यामुळे पिंपरी चिंचवड, पुणे व महाराष्ट्रात कष्टकरी कामगार वर्गामध्ये तीव्र संताप निर्माण झाला.

या घटनेत संबंधित बीएसएनएल अधिकारी यांच्या चुकीमुळे आणि मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा झाला. ज्यामुळे तीन मजुरांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा प्रकारची मागणी कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने डॉ. बाबा कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरवठा केला. 

हे पण वाचा  '... तर कितीही जण एकत्र आले तरी भोपळे मिळणार'

याबरोबरच पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांची भेट घेऊन, या प्रकरणांमध्ये तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कष्टकरी कामगार पंचायत व डॉ. बाबा कांबळे यांनी केलेल्या पाठपुरावा सफल झाला. निगडी पोलीस स्टेशन मध्ये या संदर्भामध्ये एफ आय आर (FIR) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण आता न्यायालयीन चौकशीच्या कक्षेत आले असून, दोषींविरुद्ध पुरावा संकलन, साक्षीदारांच्या जबाब आणि विधीपूर्ण तपासणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

या यशस्वी पाठपुरवठ्यानंतर डॉ. बाबा कांबळे म्हणाले, "या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना याचा आधार मिळेल, व त्यांना न्यायालयीन न्याय मिळण्याबरोबरच, आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. यात जे दोषी आहे त्यांना कठोर शासन झालेच पाहिजे, याबरोबरच ही घटना कशाप्रकारे घडली कोणी निष्काळजीपणा केला हे सगळं प्रकरण आता, गुन्हा दाखल झाल्यामुळे समोर येईल व यामुळे मृत्युमुखी पडलेल्या मजुराच्या कुटुंबियांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी देखील मदत होईल. 

डॉ. बाबा कांबळे यांनी पुढे सांगितले की, मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांना तीस लाख रुपये आर्थिक मदत मिळाली पाहिजे, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना बीएसएनएलमध्ये कायमस्वरूपी नोकरी घेतल्या घेण्यात आले पाहिजे. पुढील काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडवून आहेत यासाठी उपयोजना सेफ्ट साधनांचा वापर बंधनकारक करण्यात यावा, बीएसएनएल मध्ये असलेल्या कंत्राटी कामगारांना प्रॉव्हिडंट फंड, एसआय विमा, व कायम कामगाराप्रमाणे सुविधा मिळाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्न करत राहणार. हे प्रकरण कामगार कायद्याच्या (Labour Laws) अंतर्गत देखील तपासले जावे, ज्यात कामगार सुरक्षा कायदे (Occupational Safety and Health Act), नुकसान भरपाई कायदे (Compensation Laws) आणि कंत्राटी कामगार संरक्षण कायद्यांचा (Contract Labour Act) समावेश आहे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटनांना प्रतिबंध घालता येईल, असेही डॉ. कांबळे म्हणाले. 

 

Tags:

About The Author

Related Posts

Advertisement

Latest News

Advt