कराड अर्बन बँकेची १०७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
सभासदांना १०% लाभांश जाहीर
कराड : कराड अर्बन बँकेची १०७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २८ जुलैरोजी कराड येथील पंकज मल्टिपर्पज हॉल येथे बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांचे अध्यक्षखाली पार पडली. यावेळी माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, कार्यकारी अधिकारी सीए.दिलीप गुरव आणि सर्व संचालक तसेच व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी व सर्व सदस्यांसह सभासदांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात बँकेने एकूण व्यवसायाचा रू. ५००० कोटींचा ऐतिहासिक टप्पा पार करत एकूण व्यवसाय रू. ५१८६ कोटींवर पोहोचविला आहे. यामध्ये रू. ३२६१ कोटींच ठेवी तर रू. १९२४ कोटींचा कर्ज व्यवसाय आहे. बँकेला एकूण रु. ३७.११ कोटींचा ढोबळ तर, आयकर व तरतुदी वजा जाता रु. २४.१२ कोटींचा निव्वळ नफा झाला असून बँकेने आपली सक्षमता व सुदृढता राखली असलचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरमांणी सांगितले.
बँकेने मागील वर्षीप्रमाणे वसुलीच्या कामकाजामध्ये कृती आराखड्याची अंमलबजावणी करत जुन्या आणि नवीन एन.पी.ए. खात्यांतून लक्षणीय वसूली करत असताना नक्त एन.पी.ए.चे प्रमाण ०.४४% इतके राखले आहे. सभासदांना १०% लाभांश देत असलची घोषणा यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी केली. त्याच प्रमाणे सभासदांना मागील सर्वसाधारण सभेमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत ग्राहक सेवेमध्ये वाढ करून रिझर्व्ह बँकेकडून मोबाईल बँकिंगसाठीची परवानगी मिळविली आहे तरी सर्व सभासदांनी मोबाईल बँकिंग जास्तीत जास्त वापरून फायदा करून घ्यावा. येत्या काळात कराड अर्बन बँक सहकार क्षेत्रामध्ये अधिक सक्षम आणि सदृढ असेल असा विश्वास अध्क्ष डॉ. सुभाष एरम यांनी यावेळी व्यक्त केला.
बँकेच्या स्वभांडवलाचा पाया दिवसेंदिवस मजबूत व विस्तृत होत असून चालू वर्षांत भांडवल पर्याप्तता प्रमाण (सी.आर.ए.आर.) १६.१६% राखून आपली सक्षमता आणि सुदृढता आर्थिक प्रमाणकांवर सिद्ध केली आहे. एकूण ६२ शाखांपैकी २४ शाखांचा एन.पी.ए. शून्य टक्के आहे असून निव्वळ एन.पी.ए.चे प्रमाण ०.४४% इतके राहिले आहे. बँकेच्या ६२ शाखांपैकी एकूण ४९ शाखांनी नफा मिळवला असून २६ शाखांना १ कोटींपेक्षा अधिक नफा झाला आहे. नव्याने सुरू केलेल्या १० शाखांनी ३-४ महिन्यांमध्ये सुमारे १०० कोटींचा व्यवसाय करून ग्राहक संख्येत लक्षणीय वाढ करून दिली आहे. यातून बँकेवर समाजाचा असणारा अढळ विश्वास अधोरेखित होतो असे मत माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी व्यक्त केले.
बँकेला सन २०२३-२४ या आर्थिक सालात रिझर्व्ह बँकेने सोलापूर जिल्ह्यात बार्शी, पंढरपूर, सांगोला या तीन आणि सातारा जिल्ह्यातील वाई अशा चार नवीन ठिकाणी आणि सातारा येथील विस्तारीत कक्षाचे शाखेत रूपांतर अशा एकूण पाच नवीन शाखांना परवानगी दिली आहे. यामुळे बँकेच्या एकूण शाखांमध्ये वाढझाली असून नवीन ५ शाखा येत्या दोन महिन्यांमध्ये कार्यन्वित होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष समीर जोशी यांनी दिली.
कार्यकारी अधिकारी सीए.दिलीप गुरव यांनी नोटीस वाचन केले. मोबाईल बँकिंग सेवा देण्यासाठी बँक सज्ज असून सप्टेंबर अखेर ग्राहकांना या सुविधेचा परिपूर्ण वापर करता येईल असे सांगत कार्यकारी अधिकारी सीए.दिलीप गुरव यांनी सभेच शेवटी उपस्थितांचे आभार मानले सभेपुढे संचालकांनी सादर केलेल्या सर्व विषांना सभासदांनी मान्यता देवून सर्व ठराव एकमताने मंजूर करणत आले.
चौकट
माघील काही दिवसांपासून काही सभासद अगर बिगर सभासदांनी समाज माध्यमांद्वारे, सोशल मिडीयाद्वारे विनाकारण बँकेची बदनामी करणार्या बातम्या पसरविणे तसेच सहकार खाते, रिझर्व्ह बँक अशा ठिकाणी तथ्यहिन व दिशाभूल करणा-या तक्रारी दाखल करून बँकेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. परंतु बँकेने सहकार खाते व रिझर्व्ह बँकेला मुद्देसूद व त्याबाबतची वस्तूस्थितीची कल्पना दिली आहे, तरी अशा प्रकारचा अपप्रचार करणा-यांच्या बातम्यांना सभासदांनी बळी पडू नये असे आवाहन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी केले आहे.