महाराष्ट्र स्वराज्य पक्ष मुंबई युवक अध्यक्षपदी संतोष कदम!
On
मुंबई / रमेश औताडे
छत्रपती संभाजी राजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या मुंबई विभाग युवक अध्यक्षपदी संतोष कदम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे मुंबई, रायगड, ठाणे व पालघर अशा महत्वाच्या जिल्ह्यातील संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष अंकुश बाबा कदम, सरचिटणीस धनंजय जाधव यांनी कदम यांची नियुक्ती केली आहे. स्वयंरोजगार उपलब्ध करून जास्तीत जास्त युवकांना उद्योजक करता येईल याकडे माझे लक्ष असेल तसेच युवक संघटनात्मक बांधणी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
संतोष कदम हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माईंगडेवाडी गावचे सुपुत्र आहेत.
000
Tags:
About The Author
Latest News
01 Jun 2025 15:22:43
पुणे : प्रतिनिधी देशात ख्रिस्ती समाजावर दिवसागणिक अत्याचार वाढत आहेत. संविधानिक हक्काचा भंग काही जातीवादी शक्ती करीत आहेत. मणिपूरचा प्रसंग,...