सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुशल प्रशासक व पराक्रमी राज्यकर्ती म्हणून परिचित असलेल्या आणि इतिहासाच्या कालपटावर स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमठविणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात प्र-कुलगुरू प्रा. (डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव सीएमए (डॉ) चारुशीला गायके, अधिष्ठाता प्रा. डॉ. विजय खरे, प्रा. डॉ. सुप्रिया पाटील,परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, अधिसभा सदस्य डॉ.राजेंद्र घोडे, मुकुंद पांडे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी अर्थशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. विलास आढाव, अधिसभा सदस्य राहुल पाखरे, रासेयोचे संचालक प्रा. डॉ. सदानंद भोसले आदी मान्यवर तसेच शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
000