बीआरडीएसच्या वतीने भारतातील सर्वात मोठे डिझाईन प्रदर्शन पुण्यात संपन्न
पुणे, प्रतिनिधी - निसर्ग चित्र, मुक्तहस्त चित्र, वस्तू चित्र आणि कलाकृती, संकल्प चित्र, कोलाज आदी कलाकृतींबरोबर 3D मॉडेल्स आणि कॅनव्हासेस अशा विविध कलाकृतीचे प्रदर्शन नुकतेच पुण्यात पार पडले. भंवर राठौर डिझाईन स्टुडिओ (बीआरडीएस) या इंस्टिट्यूटच्या वतीने लोहगाव येथील गीताई लॉन्स येथे या प्रदर्शने आयोजन करण्यात आले होते. भारततातील २५ हून अधिक डिझाईन कॉलेज आणि विद्यापीठांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदविला.
डिझाईन क्षेत्रातील शिक्षण या क्षेत्रातील नोकरी आणि व्यवसायाच्या संधी तसेच एकंदरीत डिजाईन क्षेत्राविषयीची जागरूकता निर्माण करण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन दरवर्षी भारतातील 12 शहरांमध्ये आयोजित केले जाते. यामध्ये प्रामुख्याने पुणे, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, नाशिक, बंगलोर, कोलकाता, जयपूर, लखनौ, भोपाळ, हैदराबाद आणि नागपूर आदी शहरांचा समावेश आहे.
बीआरडीएसचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. भंवर राठौर म्हणाले की, फॅशन आणि टेक्सटाईल डिझाइन, इंटिरियर आणि आर्किटेक्चर डिझाइन, प्रॉडक्ट डिझाइन, ऑटोमोबाईल डिझाइन, ग्राफिक डिझाइन, अॅनिमेशन डिझाइन, फोटोग्राफी, फाईन आर्ट्स आणि बरेच काही यासारख्या डिझाइन आणि आर्किटेक्चर क्षेत्रात उपलब्ध असलेल्या अनेक विषयांची विद्यार्थ्यांना जाणीव या प्रदर्शनाच्या निमित्ताने होते. विद्यार्थ्यांची सर्जनशील कौशल्ये आणि व्यावहारिक ज्ञान प्रारंभिक अवस्थेपासून विकसित करा कारण त्यांच्या डिझाइन करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी हे एक अतिशय महत्त्वाचे साधन आहे. विद्यार्थ्यांना त्यांची सर्जनशीलता आणि कलावर्गाच्या स्वरूपात, 3d मॉडेल्स, वस्त्रे आणि 5000 हून अधिक लोकांच्या समोर पेंटिंग्जचे सादरीकरण करण्यासाठी यानिमित्ताने एक व्यासपीठ मिळते. यावेळी राठौर यांनी एनआईडी, निफ्ट, नाटा, यूसीईईडी संदर्भात विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केल्याचे भंवर राठौर यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्यात एखादी तरी कला लपलेली असते. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ निर्माण झाल्यास ती सुप्त कला विकास पावण्यासाठी मदत होते. त्यामुळे अशी प्रदर्शने उपयुक्त असल्याचे मत राठौर यांनी व्यक्त केले.
भंवर राठौर डिझाईन स्टुडिओ (बीआरडीएस) ही भारतातील 87+ केंद्रे असलेली प्रीमियर डिझाईन आणि आर्किटेक्चर एंट्रन्स कोचिंग संस्था आहे. 8000 हून अधिक विद्यार्थ्यांना गेल्या 19 वर्षात भारतातील आणि परदेशातील आघाडीच्या डिझाईन, आर्किटेक्चर आणि ललित कला महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मार्गदर्शन करत आहे.
000
Comment List